Jalna News: जालन्यात पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाला लाथ मारलेल्या प्रकरणाला नवं वळण, A टू Z माहिती
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पोलिसांच्या दडपशाहीचा प्रकार जालना शहरात समोर आला आहे. आंदोलकांवर फिल्मी स्टाईल लाथ घालणाऱ्या जालन्यातील पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जालना: पोलिसांच्या दडपशाहीचा प्रकार जालना शहरात समोर आला आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर फिल्मी स्टाईल लाथ घालणाऱ्या जालन्यातील पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसी वर्दीचा कुठलाही सन्मान न करता आपल्या अधिकारांची मगरूरी गाजवणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता समाज माध्यमांवर जोर धरत आहे. तथापि, लोकल 18 ने पीडित तरुणाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पाहुयात.
गोपाल रमेश चौधरी हे जालना शहरातील रहिवासी असून त्यांच्या पत्नीचा माहेरच्यांनी परस्पर विवाह दुसऱ्या व्यक्तीशी लावून दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या कलमांखाली कदिम जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. परंतु पोलीस आरोपींना पकडून न्यायालयात हजर करण्याऐवजी टाळाटाळ करत आहेत. तसेच आरोपींकडून पैसे घेऊन आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असल्याचा आरोप गोपाल रमेश चौधरी यांनी केला आहे.
advertisement
संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे या ध्वजारोहण करण्यासाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्याचबरोबर विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यादरम्यान पालकमंत्र्यांचा ताफा जात असताना संबंधित युवकाने हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकाला पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईल लाथ मारली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 15, 2025 9:58 PM IST
मराठी बातम्या/जालना/
Jalna News: जालन्यात पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाला लाथ मारलेल्या प्रकरणाला नवं वळण, A टू Z माहिती









