Government Schemes: लाडक्या बहिणींना मिळणार खास गिफ्ट, वाटप सुरू, तुमच्यापर्यंत पोहोचलं का?

Last Updated:

Free Saree Scheme: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खास गिफ्ट मिळणार आहे. त्यांचं वाटप सुरू झालं असून जालना जिल्ह्यातील 25 हजार महिलांपर्यंत ते पोहोचलं आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार खास गिफ्ट, वाटप सुरू, तुमच्यापर्यंत पोहोचलं का?
लाडक्या बहिणींना मिळणार खास गिफ्ट, वाटप सुरू, तुमच्यापर्यंत पोहोचलं का?
जालना: राज्य सरकार लाडक्या बहिणींना आता पैशांसोबतच साडी देखील भेट देणार आहे. राज्यात या योजनेतून साडी वाटप सुरू झालं आहे. जालना जिल्ह्यातील अंत्योदय योजनेत नाव असणाऱ्या तब्बल 43 हजार 318 महिला लाभार्थिंना मोफत साडी मिळणार आहे. राज्य सरकारने पुढील पाच वर्षांसाठी अंत्योदय योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी एक साडी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीमुळे साडीवाटप रखडलं होतं. आता मात्र साडी वाटप सुरू झालं असून 25 हजार महिलांना साड्या मिळाल्या आहेत.
राज्य सरकारकडून मागील वर्षी अंत्योदय शिधापत्रिकेत नाव असलेल्या एका महिलेस साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, यंदा होळी सणाच्या पूर्वीच साडी वाटप सुरू करण्यात आलेले आहे. जालना पुरवठा विभागासाठी 25 हजार 104 साड्या प्राप्त झालेल्या आहेत. 2028 या वर्षापर्यंत दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने हातमाग मंडळाशी करार केला आहे.
advertisement
जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांसाठी अद्याप साड्या उपलब्ध झालेल्या नाहीत. अंबड, घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यासाठी साड्या उपलब्ध झालेल्या नसल्याचे दिसून येत आहे. या तीन तालुक्यांतील 18 हजार 214 लाभार्थ्यांना अद्याप वाटप होऊ शकलेले नाही. मागील वर्षी झालेल्या शासनाने साडी वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे वाटप थांबविण्यात आले होते. शिल्लक राहिलेले वाटप निवडणुकीनंतर करण्यात आले.
advertisement
दरम्यान, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी 25 हजार 104 साड्या उपलब्ध झालेल्या आहेत. यानुसार, जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुक्यांत साडी वाटप सुरू करण्यात आलेली आहे. त्यात बदनापूर, जालना, जाफराबाद, परतूर आणि मंठा या तालुक्यात साडी प्राप्त झाल्या असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Government Schemes: लाडक्या बहिणींना मिळणार खास गिफ्ट, वाटप सुरू, तुमच्यापर्यंत पोहोचलं का?
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement