Crime News : मित्राला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं! 'झोपेत मृत्यू'चा खोटा बनाव; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं भयानक सत्य समोर

Last Updated:

Jalana Crime News : 5 सप्टेंबर रोजी दोघेजण सोबत मद्यपान करत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. आरोपी मोहम्मद सकिर याने मोहम्मद इकलाखची दाढी ओढली.

Jalana Crime friend Murdered And Admitted
Jalana Crime friend Murdered And Admitted
Jalana Crime News : जालना शहरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 सप्टेंबर रोजी हकीम मोहल्ला भागात ही घटना घडली असून, दाढी ओढल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद विकोपाला गेला होता. मोहम्मद इकलाख मोहम्मद मलिक असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर मोहम्मद सकिर बाबू असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने असा काही बनाव रचला की, पोलीस देखील थक्क झाले.

नेमकं काय घडलं?

जालना शहरातील हकीम मोहल्ला भागात मयत मोहम्मद इकलाख आणि आरोपी मोहम्मद सकिर हे एका भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. 25 सप्टेंबर रोजी दोघेजण सोबत मद्यपान करत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. आरोपी मोहम्मद सकिर याने मोहम्मद इकलाखची दाढी ओढली, यावरून दोघांमध्ये शिवीगाळ करत जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने मोहम्मद इकलाख यांना बरगडीसह पाठीवर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीमुळे मोहम्मद इकलाख यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

तपासणीनंतर डॉक्टरांना संशय

रात्री खून केल्यानंतर, आरोपी मोहम्मद सकिर याने दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला आणि 'झोपेत मृत्यू झाला' असा बनाव डॉक्टरांसमोर केला. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना संशय आला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मोहम्मद इकलाख यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आणि आरोपीचा बनाव उघडकीस आला.
advertisement

खुनाचा गुन्हा दाखल

दरम्यान, या घटनेनंतर एपीआय आरती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम पोलिस ठाण्यात आरोपी मोहम्मद सकिर बाबू याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच दिवशी आरोपीला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Crime News : मित्राला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं! 'झोपेत मृत्यू'चा खोटा बनाव; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं भयानक सत्य समोर
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement