वृक्ष संवर्धनासाठी आले एकत्र, तब्बल 1000 वृक्षांची केली लागवड, जालन्यातील क्लबचं भारीच काम, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Inspiring Story: जालना शहरातील दहा सदस्यांनी एकत्र येत ग्रीन व्हिजन क्लबची स्थापना केली आहे. या 10 सदस्यांनी मिळून शहराच्या बाजूला असलेल्या म्हसोबा टेकडीवर तब्बल 1000 वृक्षांचे रोपन केलं आहे.
जालना : अंदाधुंद विकासाच्या पाठीमागे लागलेल्या मनुष्यात प्रचंड प्रमाणावर वृक्ष तोड केल्याने जागतिक तापमान वाढीसारखं संकट आपल्यासमोर उभे राहतेय. तापमानात होत असलेली वाढ यावरच उपाय म्हणून जालना शहरातील दहा सदस्यांनी एकत्र येत ग्रीन व्हिजन क्लबची स्थापना केली आहे. या 10 सदस्यांनी मिळून शहराच्या बाजूला असलेल्या म्हसोबा टेकडीवर तब्बल 1000 वृक्षांचे रोपन केलं आहे. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करून या झाडांचे संगोपन देखील करत आहेत.
जालना शहरापासून काही अंतरावर अंबड रोडच्या बाजूला सामनगाव रोडवर ही म्हसोबा वनराई टेकडी आहे. या टेकडी तसेच परिसरात 2024 मध्ये ग्रीन व्हीजन क्लबने वृक्षारोपण करण्याचा मानस केला. सर्व सदस्यांकडून याला दुजोरा मिळाल्यानंतर सामनगाव ग्रामपंचायतकडून परवानगी मिळवली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून टेकडी तसेच परिसरात वृक्ष लागवड सुरू केली. जास्तीत जास्त देशी वृक्ष लागवडीवर या समूहाने भर दिला. आतापर्यंत जालना शहरातील विविध भागात 1000 झाडांचे रोपण आणि संवर्धन केले आहे.
advertisement
रामेश्वर हिवाळे हे स्थळ निश्चिती करून खड्डे खोदून वृक्ष लागवड करतात. श्रीराम देवगुंडे आर्थिक व्यवहार ज्यात खत, औषधी, वृक्षांची खरेदी करतात. विपुल धोत्रे हे उन्हाळ्यात वृक्ष जोपासण्याचे काम करतात. अमोल गायकवाड हे विविध कार्यालय, शाळा यांच्याशी संपर्क ठेवून वृक्षारोपणाचे नियोजन करतात. दीपक चव्हाण पशू-पक्षी यांच्या संवर्धनासाठी बियाणे संकलन करतात. राजेश गवई आणि संतोष चव्हाण हे दोघे जण वर्षभरात लागणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडतात.
advertisement
टेकडीला हिरवीगार करण्याचा मानस
view commentsम्हसोबा वनराई टेकडी हिरवीगार करणे हा या ग्रीन व्हीजन क्लबचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात या समूहाचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर करण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला वनराई टेकडीवर सुमारे आठशे वृक्ष संवर्धन करण्यात यश आले आहे. या समूहाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत वृक्ष संवर्धन, रोपण तसेच पशू-पक्षी संवर्धन, पर्यावरणाबद्दल जागरूकता करणे या उद्देशाने कार्य करायचे नियोजित असल्याचे अमोल गायकवाड यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
May 16, 2025 10:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
वृक्ष संवर्धनासाठी आले एकत्र, तब्बल 1000 वृक्षांची केली लागवड, जालन्यातील क्लबचं भारीच काम, Video










