Maratha Reservation : मराठा आंदोलनावेळी दगडफेक प्रकरणी जालन्यात चौघांना अटक

Last Updated:

अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केलीये.

News18
News18
जालना, 25 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण केलं होतं. सुरुवातीला केलेल्या उपोषणावेळी हिंसाचाराची घटना घडली होती. तेव्हा आंदोलनावेळी दगडफेकीचे प्रकारही घडले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पिस्तुल अन् जिवंत काडतुसेसुद्धा सापडली आहेत. चौघांवर गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केलीये.. ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसट,कैलास सुखसे यांच्यासह निलेश बळीराम राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे.. दगडफेक प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने तपास करत असताना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऋषिकेश बेदरेंसह तीन जण पोलिसांना मिळून आले.
advertisement
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपींना अंबड येथील पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ऋषिकेश बेदरे यांच्याजवळ एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसं सापडलीयेत.. दरम्यान पोलिसांनी या चारही जणांना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे..
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maratha Reservation : मराठा आंदोलनावेळी दगडफेक प्रकरणी जालन्यात चौघांना अटक
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement