Free Haircut: जालन्यातील नाभिक समाजानं ठरवलं, रस्त्यावर थाटलं दुकान, मोफत करतायत दाढी-कटिंग, Video

Last Updated:

जालना शहरामध्ये ही पालखी दरवर्षी दोन मुक्काम करते. नाभिक समाजाने एकत्र येत वारकऱ्यांची दाढी-कटिंग मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

+
News18

News18

जालना: महाराष्ट्राला संत-महात्म्यांची, वारकऱ्यांची परंपरा लाभली आहे. दरवर्षी शेकडो किलोमीटर अंतर पायी चालून विठ्ठलाच्या ओढीने वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. आषाढी एकादशी संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा माघारी फिरतात. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरवरून शेगावकडे रवाना होत आहे. दरम्यान जालना शहरामध्ये ही पालखी दरवर्षी दोन मुक्काम करते.
जालना शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयात पहिलातर जे..एसमहाविद्यालयात दुसरा अशी मुक्कामाची ठिकाणे आहेतयंदा सरस्वती भुवन महाविद्यालयात बांधकाम सुरू असल्याने कल्याणराव घोगडे स्टेडियमवर पालखीचा पहिला मुक्काम होतातर दुसरा मुक्काम जे..एसमहाविद्यालयात आहे.
advertisement
आपल्या हातूनही काहीतरी सेवा घडावी म्हणून जालना शहर आणि रामनगर साखर कारखाना येथील नाभिक समाजाने एकत्र येत वारकऱ्यांची दाढी-कटिंग मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीपासून त्यांनी ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दिंडीमध्ये साधारणपणे 700 वारकरी सहभागी असतात.
यामध्ये काही महिला वारकरी असतात. जवळपास 500 पुरुष वारकऱ्यांची दाढी आणि कटिंग करण्याची सेवा करण्याचा संकल्प शहरातील नाभिक व्यवसायिकांनी केला आहे.
advertisement
संत गजानन महाराज यांच्याविषयी असलेली श्रद्धा आणि भावनेतून आम्ही हे काम करत आहोतयंदाही आमच्या सेवेचे दुसरे वर्ष आहेयापुढेही अविरतपणे ही सेवा अशीच सुरू राहणार आहे. प्रत्येक जण वारकऱ्यांचीसंतांची आपापल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतोआम्ही देखील आमच्या पद्धतीने वारकऱ्यांची दाढी-कटिंग करून ही सेवा करत आहोत, असं व्यावसायिक रमेश राऊत यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/जालना/
Free Haircut: जालन्यातील नाभिक समाजानं ठरवलं, रस्त्यावर थाटलं दुकान, मोफत करतायत दाढी-कटिंग, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement