Healthy Fruit: फळ एक फायदे अनेक! हृदयासाठी अमृत, शुगर वाढीचं तर टेन्शनच नाही

Last Updated:

Healthy Fruits: सध्या बाजारात मिळणार नासपती हे फळ हृदय आणि शुगरच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायी मानलं जातं. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिलीये.

+
Healthy

Healthy Fruit: फळ एक फायदे अनेक! हृदयासाठी अमृत, शुगर वाढीचं तर टेन्शनच नाही

छत्रपती संभाजीनगर: सध्या बाजारात नेहमीच्या फळांपेक्षा काही वेगळी फळे देखील दिसतात. त्यापैकीच एक आरोग्यदायी फळ म्हणजे नासपती होय. हे एक मऊ, गोड आणि रसाळ फळ असून सफरचंदापेक्षा आकाराने थोडे मोठे असते. याच फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ आवर्जून खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याच नासपती फळाबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ डॉ. नितीन संचेती यांनी माहिती दिली आहे.
नासपती हे वरच्या बाजूला थोडे बारीक आणि खालून गोल आकारात असते, ज्याला पीअर शेप म्हणतात. नासपती हे फळ कोलेस्ट्रॉल मुक्त आहे आणि 100 कॅलरी पॅकेज मध्ये सर्व पोषक घटकांनी भरलेले आहे, तसेच नासपती फळाचा हृदयाचे आरोग्य सुधारणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, या गुणधर्मामुळे ते केवळ स्वादिष्ट फळ नसून, निरोगी आरोग्यासाठी बाकी फळांसोबतच उत्तम पर्याय आहे, असे डॉ. संचेती सांगतात.
advertisement
नासपती हे फळ बाजारात सर्वत्र उपलब्ध असते. तसेच या फळात व्हिटामिन बी, सी आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच हार्डीसीस, ब्लड प्रेशर, डायबिटीजसाठी मोठा फायदा मिळतो. याबरोबरच नासपती वजन कमी करण्यास देखील मदत करते. नासपतीमध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. हे संयोजन वजन कमी करण्यासाठी लाभदायी ठरते, असंही डॉक्टर सांगतात.
advertisement
साखरेची पातळी नियंत्रित करते
साखर नैसर्गिकरित्या सर्व फळांमध्ये आढळते, परंतु इतर फळांच्या तुलनेत फळाचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो, त्यामुळे त्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी रोखण्यास मदत करते. मात्र, ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे, असे डॉ. संचेती यांनी सांगितले.
दरम्यान, दैनंदिन जीवनात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी 'नासपती' हे फळ खाणे आरोग्यासाठी लाभदायी आणि अनेक आजारांसाठी फायदेशीर ठरत आहे.
मराठी बातम्या/हेल्थ/
Healthy Fruit: फळ एक फायदे अनेक! हृदयासाठी अमृत, शुगर वाढीचं तर टेन्शनच नाही
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement