Kolhapuri Mutton: गटारीसाठी अस्सल कोल्हापुरी मटण, असं बनवाल तर बोटं चाखत खाल, एकदम झणझणीत रेसिपी!

Last Updated:
Kolhapur Mutton: आषाढ संपून व्रत-वैकल्यांचा श्रावण महिना सुरू होतो. या काळात अनेकजण मांसाहार टाळतात. त्यामुळे आषाढी अमावस्येच्या अगोदरच अनेकजण मांसाहार करतात. अनेकजण गटारी म्हणून चिकन, मटण, मासे, अंड्यांवर ताव मारतात. यात अनेकांची पसंती अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा अन् झणझणीत मटणाला असते. याचीच रेसिपी जाणून घेऊ.
1/7
कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा अन् मटन थाळी म्हटलं की मांसाहार प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं. आता श्रावणाच्या अगोदर एकदा आपल्या घरीच हा बेत करू शकता. कोल्हापुरी स्टाईलचं मटण बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे.

advertisement
2/7
जर अर्धा किलो मटण असेल तर त्यासाठी 2 चमचे तेल, 2 बारीक चिरलेले कांदे, 6-7 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा एक तुकडा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घ्यायचा.

3/7
तुमच्याकडे घरी बनवलेला कोल्हापुरी मसाला नसेल तर विकत घेण्याचा पर्याय आहेच. त्याचे 2-3 चमचे, तिखट मसाला (आवडीनुसार), चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि कपभर पाणी घ्यायचं.

4/7
कोल्हापुरी मसाला घरी बनवायचा असेल तर दालचिनीचा 1 इंचाचा तुकडा, काळीमिरी 5-6, लवंग 2-3, वेलची 2, तिळ 1 चमचा, सुका नारळ 1/4 कप, गरम मसाला 1/2 चमचा, धणे 1 चमचा, जिरे 1 चमचा, कोथिंबीर 1 चमचा पेस्ट हे साहित्य घ्यायचं. मसाला बनवताना सर्व मसाले एकत्र करून मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची.

5/7
आता झणझणीत कोल्हापुरी मटण बनवण्यासाठी आधी मटण साफ धुवून घ्यायचं. त्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून ते चांगलं परता.

6/7
टोमॅटो घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्या. हळद, मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर आणि कोल्हापुरी मसाला त्यात घाला आणि सर्व मिश्रण परतून घ्या. त्यानंतर मटण घालून ते 5-10 मिनिटं शिजू द्या.

7/7
आता मटणावर पाणी घालून मीठ टाका आणि झाकण ठेवून द्या. मटण पूर्णपणे शिजू द्या. साधारण 30-40 मिनिटं मटण शिजायला मध्यम आचेवर ठेवा. त्यानंतर तुमचं झणझणीत कोल्हापुरी मटण तयार होईल. वरून मस्तपैकी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. घरच्या घरी बनवलेला हा बेत सगळ्यांनाच नक्की आवडेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement