होळीसाठी रेल्वेचं मराठवाड्याला गिफ्ट, जालन्यातून धावणार विशेष गाड्या, थांबे कुठे?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Holi 2025: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. होळीनिमित्त जालन्यातून विशेष गाड्या धावणार आहेत.
जालना: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. होळीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. रेल्वेन होळीनिमित्त जालना ते पटना दरम्यान विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या चालविण्याचे ठरविले आहे. तसेच काचीगुडा ते मदार जंक्शन (अजमेर जवळ) विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
जालना ते पटना विशेष रेल्वे (क्र. 07611) जालना येथून 6, 10 आणि 18 मार्चला रात्री 10 वाजता सुटेल आणि परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, बुऱ्हाणपूर, खांडवा, जुझार्पूर, इटारसी, पिपरिया, नरसिंघपूर, मदन महल, कटनी, मल्हार, सतना, मानिकपूर, प्रयागराज चातकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, अरा, दानापूर मार्गे पटना येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 9:45 वाजता पोहोचेल.
advertisement
पटना ते जालना विशेष रेल्वे (गाडी क्रमांक 07612) पटना येथून 8, 12 आणि 17 मार्चला दुपारी 3:45 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच जालना येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 2:35 वाजता पोहोचेल.
नांदेड, परभणी, पूर्णा, वसमतमार्गे धावणार
काचीगुडा ते मदार विशेष रेल्वे (गाडी क्रमांक 07701) काचीगुडा येथून 11 आणि 16 मार्चला रात्री 23:30 वाजता सुटेल आणि मल्काजगिरी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, अकोला, शेगाव, मलकापूर, बुऱ्हाणपूर, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, उज्जैन, रतलाम, जोरा, मंदसोर, नीमच, चित्तौरगढ, बिजैनगर, नासिराबाद, अजमेर मार्गे मदार येथे तिसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता पोहोचेल
advertisement
मदार ते काचीगुडा विशेष रेल्वे (गाडी क्रमांक 07702) मदार येथून 13 आणि 18 मार्चला दुपारी 16:05 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता पोहोचेल.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
March 03, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
होळीसाठी रेल्वेचं मराठवाड्याला गिफ्ट, जालन्यातून धावणार विशेष गाड्या, थांबे कुठे?