advertisement

गृहमंत्र्यांचा तोतया ओएसडी अन् कल्पनाच्या प्रियकराला बेड्या, रात्री दिल्लीतून दोघांना घेतलं ताब्यात

Last Updated:

गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तोतया आयएएस अधिकारी म्हणून वास्तव्य करणाऱ्या कल्पना भागवत प्रकरणाला आता मोठं वळण लागलं आहे

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तोतया आयएएस अधिकारी म्हणून वास्तव्य करणाऱ्या कल्पना भागवत प्रकरणाला आता मोठं वळण लागलं आहे. तपास यंत्रणांनी रात्री उशिरा मोठी कारवाई करत, तिच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरी या तोतया अधिकाऱ्याला दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहेत. इतकेच नव्हे तर, कल्पनाचा प्रियकर महंमद अशरफ यालाही रात्रीच दिल्लीत पकडण्यात आलं आहे.
कल्पना भागवत ही अभिषेक चौधरीच्या सतत संपर्कात होती. त्यामुळे, अशा अनेक तोतया आयएएस अधिकाऱ्यांचे एक मोठे सिंडिकेटच कार्यरत असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. सोमवारपासून तपास यंत्रणांची चार विशेष पथके दिल्ली, नोएडा, हरयाणा आणि राजस्थानच्या सीमेवर या आरोपींचा कसून शोध घेत होती. अखेर रात्री उशिरा या तोतया 'ओएसडी'ला पकडण्यात तपास यंत्रणांना मोठे यश आले.
advertisement

आर्थिक व्यवहार आणि परदेशी कनेक्शनची शक्यता

तपास यंत्रणा आता या तोतया 'ओएसडी' आणि कल्पनाच्या प्रियकराच्या आपसातील संपर्काची आणि या दोघांचेही विदेशी लोकांसोबत काही संबंध आहेत का, या दिशेने तपास करत आहेत. यासाठी एका स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कल्पना भागवतच्या बँक खात्यात विविध व्यक्तींकडून १९ लाख रुपये जमा झाल्याचे उघड झाले होते, ज्यामुळे हे एक मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले होते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी या १९ लाखांच्या व्यवहारांचा तपशील दिला आहे. यात दत्तात्रयने ७ लाख ९० हजार, अभिजितने १ लाख ५० हजार, अशरफ (प्रियकर) २ लाख ३१ हजार, जैनने १ लाख ५० हजार, सुधाकरने १ लाख २१ हजार, आष्टेकरने १ लाख ५० हजार आणि बहादुरे यांनी ९८ हजार रुपये महिलेला पाठवल्याचं समोर आलं आहे.
advertisement
आता कल्पनाला पैसे देणारी ही माणसं कोण आहेत आणि त्यांनी कल्पनाला कशासाठी हे पैसे दिले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपास यंत्रणांनी सखोल तपासाला सुरुवात केली असून यातून आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गृहमंत्र्यांचा तोतया ओएसडी अन् कल्पनाच्या प्रियकराला बेड्या, रात्री दिल्लीतून दोघांना घेतलं ताब्यात
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement