उसने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केला, अलका गवाळे आठवड्याला कमावतात हजारो रूपये; वडापावची सर्वत्र चर्चा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
कल्याण मुरबाड हायवे वरील रायते गावातील मावशीचा वडापाव खाण्यासाठी अनेकांची गर्दी होते. अशिक्षित असलेल्या अलका गवाळे गेल्या 20 ते 25 वर्षापासून वडापावचा व्यवसाय करतात.
कल्याण मुरबाड हायवे वरील रायते गावातील मावशीचा वडापाव खाण्यासाठी अनेकांची गर्दी होते. अशिक्षित असलेल्या अलका गवाळे गेल्या 20 ते 25 वर्षापासून वडापाव चा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने गवाळे यांनी 1000 रु उसने पैसे घेऊन सुरू केलेला वडापावचा व्यवसाय आज खाण्यासाठी गर्दी होते. वडापाव बनविण्याची संपूर्ण पद्धत ही घरगुती तसेच पाट्यावरची चटणी ठेचा असल्याने आवर्जून लोक तिथे खाण्यासाठी गाडी थांबवतात.
अलका गवाळे यांच्या या व्यवसायात त्यांच्या आईचा खूप मोठा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. कारण त्याची छोटी मुलगी 6 महिन्याची असताना त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. ज्या परिस्थितीत महिलांना आरामाची गरज असते त्या वेळी त्यांनी काहीतरी व्यवसाय करायला हवा या हेतूने वडापाव चा व्यवसाय सुरू केला. कारण त्यावेळी नवऱ्याची साथ नसल्याने 4 मुलांचा सांभाळ एकटीवर पडला.शिक्षण असते तर आज मी बाहेर असती परंतु अशिक्षित असलेल्या अलका गवाळे यांनी मुलांची पूर्ण जबाबदारी ही त्यांच्या आई वर टाकली आणि स्वतः उभ्या राहिल्या.
advertisement
आज त्या त्यांची आठवडा इन्कम 20 ते 30 हजार काढतात. त्यात त्यांनी घरातून सुरू केलेल्या वडापावचा व्यवसाय छोटी टपरी बांधून सुरू केला.त्यानंतर त्यांनी. 2015 ला टपरीच्या जागेवर छोट हॉटेल बांधले तिथे चहा, बिस्कीट, लहान मुलांसाठी लागणारा खाऊ तसेच वडापाव सुरु केला. परंतु नियतीने पुन्हा त्यांच्या व्यवसायावर नजर फिरवली आणि समृद्धी हायवेमध्ये ते हॉटेल तोडण्यात आले. तरी ही धीर न सोडता अलका गवाळे यांनी पुन्हा उभ राहून टपरी सुरू केली. तरी आज ही तेवढीच माणसं आणि तेवढीच गर्दी वडापाव खाण्यासाठी येते.असा हा त्यांचा संघर्षमय प्रवास अनेक अशिक्षित महिलांना प्रेरणा देणारा ठरला. आज त्यांनी 4 ही मुलामुलींना शिकवून सरकारी नोकरी तसेच उच्च शिक्षण दिले. परिस्थिती कशी येऊदे अलका यांनी त्यातून मार्ग काढून आज त्या त्यांच्या व्यवसायात समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 06, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उसने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केला, अलका गवाळे आठवड्याला कमावतात हजारो रूपये; वडापावची सर्वत्र चर्चा