Ahilyanagar Karjat Jamkhed : कर्जत-जामखेडच्या राजकारणात खळबळ, राम शिंदेंनी डाव टाकला, रोहित पवारांना बसणार धक्का!

Last Updated:

Rohit Pawar Ram Shinde : कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांची कोंडी करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

कर्जत-जामखेड राजकारणात खळबळ, राम शिंदेंनी डाव टाकला, रोहित पवारांना बसणार धक्का!
कर्जत-जामखेड राजकारणात खळबळ, राम शिंदेंनी डाव टाकला, रोहित पवारांना बसणार धक्का!
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, अहिल्यानगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकांचा परिणाम राज्याच्या राजकारणावरही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळेच रणनीती आखण्यावर सगळ्या राजकीय पक्षांचा भर असून नवीन डाव टाकले जात आहेत. कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांची कोंडी करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नुकतेच राजीनामा दिलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या घरी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिवाळी निमित्त भेट दिली. ही भेट औपचारिक शुभेच्छा भेट असली तरी, राजकीय वर्तुळात मात्र तिचा अर्थ वेगळाच लावला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र फाळके हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील पक्षाचे एक प्रभावी आणि विश्वासू नेते मानले जात होते. शरद पवार यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पत्रात त्यांनी “वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत आहे. असे नमूद केले असले, तरी पक्षातील काहींना विश्वासात न घेतल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला होता.
advertisement

भाजपात प्रवेश?

फाळके यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष ठरली आहे. भाजप नेते आणि सभापती राम शिंदे यांनी फाळके यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने, फाळके भाजपात प्रवेश करणार का? या चर्चेला आता उधाण आलं आहे.

रोहित पवारांना धक्का?

कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व असले, तरी फाळके हे त्यांचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे फाळके यांच्या भूमिकेमध्ये झालेला बदल हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
advertisement
राजकीय निरीक्षकांच्या मते, फाळके हे संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आणि गट बांधणीत पारंगत नेते आहेत. त्यांचा भाजपा प्रवास सुरू झाला तर, कर्जत-जामखेडमधील समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.
दरम्यान, दोन्ही नेत्यांनी ही भेट ‘दिवाळीच्या शुभेच्छांसाठी’ असल्याचे सांगितले असले, तरी राजकीय पातळीवर मात्र या भेटीचे परिणाम लवकरच दिसू लागतील, अशी चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilyanagar Karjat Jamkhed : कर्जत-जामखेडच्या राजकारणात खळबळ, राम शिंदेंनी डाव टाकला, रोहित पवारांना बसणार धक्का!
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement