Kolhapur : उपसरपंचांच्या पत्नीची सापडली बॉडी; क्षणात होत्याचं नव्हतं! कोल्हापूरच्या आटेगावात काय घडलं?

Last Updated:

Kolhapur Deputy sarpanch wife Death : आटेगाव येथील अनुराधा नामदेव कांबळे या ३८ वर्षीय महिला शनिवारी दुपारी दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.

Kolhapur Dudhganga River Body of deputy sarpanch wife
Kolhapur Dudhganga River Body of deputy sarpanch wife
Kolhapur Dudhganga River : कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात शनिवारी दुपारच्या सुमारास काळाने अचानक झडप घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील दैनंदिन कामे आटोपण्यासाठी गेलेली उपसरपंचाची पत्नी बराच वेळ परतली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली, मात्र तिथे केवळ काही वस्तूच आढळून आल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

कालव्यावर धुणं धुण्यासाठी गेल्या अन्...

आटेगाव येथील अनुराधा नामदेव कांबळे या ३८ वर्षीय महिला शनिवारी दुपारी दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यावर धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. साधारण ३.३० ते ४.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कालव्याच्या काठावर काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने त्या पाण्यात वाहून गेल्या. त्या घरी न परतल्याने पती नामदेव कांबळे व नातेवाईकांनी कालव्याकडे धाव घेतली, तेव्हा तिथे केवळ त्यांच्या चप्पला आणि भिजलेल्या गोधड्या पडलेल्या होत्या.
advertisement

कालव्याच्या झुडुपात अनुराधा यांचा मृतदेह

या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली. शनिवारी अंधार झाल्यामुळे शोध कार्यात अडथळे आले, मात्र रविवारी सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली. अखेर सरवडे येथील कालव्याच्या झुडुपात अनुराधा यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत सापडला. सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून राधानगरी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
advertisement

उपसरपंच म्हणून कार्यरत

दरम्यान, अनुराधा यांचे पती नामदेव कांबळे हे गावाचे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आईच्या जाण्याने मुलांनी फोडलेल्या हंबरड्यामुळे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने कालव्याच्या परिसरात वावरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur : उपसरपंचांच्या पत्नीची सापडली बॉडी; क्षणात होत्याचं नव्हतं! कोल्हापूरच्या आटेगावात काय घडलं?
Next Article
advertisement
BJP Congress Alliance : पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं
  • काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसच्या युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती.

  • आता पुन्हा एकदा भाजप काँग्रेसची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

  • काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असल्याने आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

View All
advertisement