कोल्हापुरात बिबट्याचा धुमाकूळ, पोलिसावर जीवघेणा हल्ला, धडकी भरवणारा VIDEO

Last Updated:

कोल्हापूर शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वूडलँड हॉटेल, बीएसएनएल कार्यालय आणि महावितरणाच्या कार्यालयात बिबट्याचा वावर दिसला आहे. दरम्यान बिबट्याने एका पोलिसावर जीवघेणा हल्ला केला आहे.

News18
News18
कोल्हापूर शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वूडलँड हॉटेल, बीएसएनएल कार्यालय आणि महावितरणाच्या कार्यालयात बिबट्याचा वावर दिसला आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला. अशाप्रकारे दिवसाढवळ्या बिबट्या शहरात फिरत असल्याने कोल्हापूरकरांची तारांबळ उडाली आहे. याबाबतचे काही धडकी भरवणारे व्हिडीओज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज परिसरात देखील बिबट्या शिरला होता. यावेळी बिबट्याने एका पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. कॉलेज परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी चवथाळलेल्या बिबट्याने एका पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर चवथाळलेला बिबट्या घाबरून पळून गेला.
advertisement
या बाबतचा धडकी भरवणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात एक बिबट्या घराच्या निमुळकत्या भागात शिरल्याचं दिसत आहे. यावेळी वनविभागाचे पोलीस कर्मचारी बिबट्याला मानवी वस्तीतून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवेळी बिबट्या चाल करून पोलिसांच्या दिशेनं आलं. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस जीव मुठीत घेऊन पळून गेले.
advertisement
पण यातील एक पोलीस मात्र बिबट्याच्या तावडीत सापडले. बिबट्याने चवथाळून त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाची बाब म्हणजे यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात संबंधित पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशाप्रकारे बिबट्याचा शहरात वावर वाढल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरात बिबट्याचा धुमाकूळ, पोलिसावर जीवघेणा हल्ला, धडकी भरवणारा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement