मंत्री नितेश राणे, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका, अटक वॉरंट जारी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कुडाळ पोलीस स्थानकात एका आंदोलन प्रकरणात मंत्री नितेश राणे, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासहित कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले प्रविण दरेकर त्याचबरोबर प्रसाद लाड यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयाने अटक वॉरंट जारी जारी केले आहे. कुडाळ पोलीस स्थानकात एका आंदोलन प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.
राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधातही न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
advertisement
राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य आरोपी उपस्थित राहिले. तर नितेश राणे यांच्यासह अन्य पाच जण गैरहजर होते.
न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारत अटक वॉरंट जारी केले. मात्र नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याच्या प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 3:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंत्री नितेश राणे, प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका, अटक वॉरंट जारी









