Panvel News: महापालिकेने दिलेल्या नाश्त्यात सापडल्या अळ्या! ठेकेदाराने दिलं अजब स्पष्टीकरण
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Panvel News: अतिवृष्टीमुळे पनवेल महानगरपालिकेने 19 ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथे काही नागरिकांना स्थलांतरित केलं होतं.
मुंबई : कोणत्याही सरकारी कामाचा दर्जा निकृष्टच असतो, असं अनेक नागरिकांचं मत आहे. पनवेलमध्ये या मताला बळकटी देणारी घटना घडली आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पनवेल महानगरपालिकेने 19 ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथे काही नागरिकांना स्थलांतरित केलं होतं. त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची आणि खाण्याची सोय केली होती. या स्थलांतरित नागरिकांना दिलेल्या नाश्त्यात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत जेवणाचं कंत्राट असलेल्या ठेकेदाराने अजब स्पष्टीकरण दिलं आहे.
अतिवृष्टीमुळे स्थळांतरित झालेल्या नागरिकांना 'मैत्री केटरर्स' नावाने व्यवसाय असलेल्या एका ठेकेदाराने नाश्ता पुरवला होता. त्याने दिलेल्या खाद्यपदार्थामध्ये अळ्या सापडल्या होत्या. ही बाब उघड झाल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्याकडे खुलासा मागितला होता. अतिपावसामुळे नाश्त्यात अळ्या सापडल्या, असं स्पष्टीकरण या ठेकेदारानं दिलं आहे. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.
advertisement
ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार, पालिकेच्या सूचनेनुसार त्याच दिवशी अन्य पाच ठिकाणी नाश्ता, चहा तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, नवीन पनवेलमध्येच हा प्रकार घडला. तर, धक्कादायक प्रकाराबाबत खुलासा करताना थातुरमातूर कारणं देऊन त्यावर पडदा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. अतिपावसात एखाद्या खाद्यपदार्थात अळ्या कशा काय पडू शकतात? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे
advertisement
अतिवृष्टीत पनवेलमध्ये कुठेही पाणी साचू नये, म्हणून महापालिकेनं काटेकोर नियोजन केलं होतं. मात्र, स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाश्त्यात अळ्या सापडल्याच्या प्रकारामुळे पालिकेच्या नियोजनाला डाग लागला. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panvel News: महापालिकेने दिलेल्या नाश्त्यात सापडल्या अळ्या! ठेकेदाराने दिलं अजब स्पष्टीकरण