advertisement

Latur: लातूरमध्ये आयकर अधिकाऱ्याची मुलाकडून हत्या, छोट्याशा कारणावरून वाद अन् सगळं संपलं

Last Updated:

आयकर अधिकारी असलेल्या वडिलांची मुलाने छोट्याशा कारणातून वाद झाल्याने थेट हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लातूर आयकर अधिकाऱ्याची हत्या
लातूर आयकर अधिकाऱ्याची हत्या
शशिकांत पाटील, प्रतिनिधी, लातूर : आयकर विभागात अधिकारी असलेल्या वडिलांचा त्यांच्या मुलानेच चाकूने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना लातूर शहराजवळील खोपेगाव परिसरात घडली आहे. कृष्णकुमार सन्मुखराव असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे.
ही घटना ०३ फेब्रुवारी रोजी सन्मुखराव कुटुंबाच्या राहत्या घरी घडली. घटनेने लातूर परिसरात खळबळ उडाली आहे. मूळचे अहमदपूर तालुक्यातील रहिवासी असलेले कृष्णकुमार सन्मुखराव हे आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी लातूर शहराजवळील खोपेगाव शिवारात प्लॉट घेऊन नुकतेच घर बांधले होते.
आज दुपारी ते घरी असताना त्यांचा मुलगा शंतनू सन्मुखराव याने घरगुती वादातून अचानक वडिलांच्या पोटात चाकू खुपसल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात कृष्णकुमार सन्मुखराव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल आला आहे. वडिलांच्या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. या खून प्रकरणाची पोलीस चौकशी करीत असून चौकशीत खूनाचे कारण स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur: लातूरमध्ये आयकर अधिकाऱ्याची मुलाकडून हत्या, छोट्याशा कारणावरून वाद अन् सगळं संपलं
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement