advertisement

'केदारने मला कपडे - चपला उचलायचं काम दिलं', मावशीनंतर भावाचीही नाराजी, केले धक्कादायक खुलासे

Last Updated:

'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा आल्यानंतर केदार शिंदे यांच्या मावशी चारुशीला साबळे वाच्छानी यांनी कामाबाबत खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता केदार यांचे भाऊ मंदार शिंदे यांनीही आपली व्यथा मांडत काही धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत.

News18
News18
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. पण मागील काही काळापासून केदार शिंदे हे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक वादामुळेही चर्चेत आले आहेत. केदार शिंदे हे शाहिर साबळे यांचे नातू. याच साबळे कुटुंबीयांकडून केदार शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत असल्याचं दिसत आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा आल्यानंतर केदार शिंदे यांच्या मावशी चारुशीला साबळे वाच्छानी यांनी कामाबाबत खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता केदार यांचे भाऊ मंदार शिंदे यांनीही आपली व्यथा मांडत काही धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत.
केदार शिंदे यांचे भाऊ मंदार शिंदे सध्या मुंबईत एका व्यावसायिकाकडे ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. घर चालवण्यासाठी हे काम करावं लागत आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "लोकधारेपासून सुरु झालेला माझा हा प्रवास. मालिका दिग्दर्शन, सिनेमा दिग्दर्शन, इव्हेन्ट दिग्दर्शन अशा अनेक गोष्टींचं दिग्दर्शन मी केलं. हा सुरु झालेला प्रवास शेवटी येऊन संपतोय तो ड्रायव्हिंग या माझया व्यवसायावर. मी पद्मश्री शाहीर साबळे यांचा नातू."
advertisement
मंदार शिंदे यांनी सांगितलं की, केदार शिंदे यांनी त्यांना एका मालिकेसाठी कलाकारांचे कपडे आणि चपला ने-आण करण्याचं काम दिलं होतं. त्या कामासाठी त्यांना 100 रुपये मिळायचे. "एका काळात मला चित्रपट दिग्दर्शनाची संधी मिळाली होती. मात्र निर्मात्याने तो चित्रपट काढून घेतला. का घेतला माहिती नाही", असंही ते म्हणाले.
advertisement
मंदार शिंदे पुढे  म्हणाले, "13 जानेवारी रोजी सकाळी मला एक फोन आला. तो फोन पोलिसांचा होता. तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे. मुलाच्या उपचारांसाठीचा खर्च मोठा होता. मी एका व्यापान्याकडे ड्रायव्हिंगचा जॉब करतो. सुरुवातीला थोडं वाईट वाटलं पण माझं घर चालवायचं आहे.
advertisement
"आपल्या इंडस्ट्रीत कंपूशाही आहे. एखादा कितीही चांगला कलाकार किंवा दिग्दर्शक असला तरी त्याला काम दिलं जात नाही. घरातच काम मिळत नसेल तर बाहेर काय मागणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केदार शिंदे यांच्या मावशी चारुशीला साबळे वाच्छानी यांनीही यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. आजोबा शाहीर साबळे यांच्या ‘लोकधारा’ कार्यक्रमातून केदार यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र पतीच्या निधनानंतर  चारुशीला यांना कामाची गरज असताना केदार यांनी मदत केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
advertisement
या सगळ्या आरोपांबाबत केदार शिंदे यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र कुटुंबातील सदस्यांकडून व्यक्त होत असलेल्या नाराजीमुळे हा विषय सध्या चर्चेत आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'केदारने मला कपडे - चपला उचलायचं काम दिलं', मावशीनंतर भावाचीही नाराजी, केले धक्कादायक खुलासे
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement