advertisement

Latur ZP Election : धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!

Last Updated:

महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये थरारक निकाल लागले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये नणंदेने भावजयीला पराभवाचा धक्का दिला आहे.

धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!
धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!
शशिकांत पाटील, प्रतिनिधी
लातूर : महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये थरारक निकाल लागले आहेत. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषदेमध्ये अटीतटीची लढत झाली. या लढतीमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी त्यांच्याच जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना धक्का बसला आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी 52 जागांचे निकाल लागले आहेत, ज्यात काँग्रेस हा 19 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, तर भाजपला 17 जागांवर विजय मिळाला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला एक आणि 2 अपक्ष विजयी झाले आहेत.
advertisement
लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता असली तरी भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेनेच्या मदतीने बहुमतापर्यंत पोहोचू शकते. विजयी झालेले 2 अपक्ष कोणती भूमिका घेणार? यावरही सत्तेचं गणीत अवलंबून असणार आहे.

संभाजी नगरमध्ये एका मताने पराभव

advertisement
संभाजी नगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा एका मताने विजय झाला आहे. सचिन गरड यांनी हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला. एका मताने निवडून आलेल्या गरड यांना या विजयानंतर अश्रू अनावर झाले. वाळू माफिया आणि ताकदवर उमेदवारांच्या विरोधात लढलो. जनतेने सामान्य व्यक्तीला निवडून दिलं, त्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया सचिन गरड यांनी दिली आहे.
advertisement
दुसरीकडे पराभव मान्य करतो, एका मताने का होईना पराभव असतो आणि त्या एका मताची किंमत मला आज कळाली, असं वक्तव्य हनुमंत भोंडवे यांनी केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election : धाकट्या जाऊबाईंकडून मोठीचा 2 मतांनी पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीचा सगळ्यात थरारक निकाल!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement