advertisement

एका रात्रीत करोडपती झाले 249 ग्राहक, क्रिप्टो एक्सचेंजने चूकून पाठवले 15000000000 रुपयांचे बिटकॉइन

Last Updated:

एका छोट्याशा 'टायपिंग मिस्टेक'मुळे एका नामांकित कंपनीला हजारो कोटींचा फटका बसला आणि क्रिप्टो मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपल्याला एखादा मेसेज आला की 'तुमच्या खात्यात 500 रुपये जमा झाले आहेत', तरी आपल्याला किती आनंद होतो. समजा, चुकून कोणाचे तरी दोन-पाच हजार रुपये आपल्या खात्यात आले, तर आपण गोंधळून जातो. पण विचार करा, जर शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस सुटताना तुमच्या मोबाईलवर मेसेज आला की, तुमच्या खात्यात चक्क 1500 कोटी रुपये जमा झाले आहेत... तर?
स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट दक्षिण कोरियातील शेकडो लोकांच्या बाबतीत प्रत्यक्षात घडली आहे. एका छोट्याशा 'टायपिंग मिस्टेक'मुळे एका नामांकित कंपनीला हजारो कोटींचा फटका बसला आणि क्रिप्टो मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली.
ही अजब घटना घडली आहे दक्षिण कोरियातील दिग्गज क्रिप्टो एक्सचेंज 'बिथम' (Bithumb) सोबत. झालं असं की, कंपनीने एका प्रमोशनल इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या 249 नशीबवान युजर्सना बक्षीस म्हणून काही 'कोरियाई वॉन' (कोरियाचे चलन) द्यायचे होते. पण, हे बक्षीस पाठवताना एका कर्मचाऱ्याकडून युनिट निवडताना चूक झाली. त्याने 'वॉन' ऐवजी चक्क 'BTC' (Bitcoin) निवडून 6,20,000 बिटकॉइन ट्रान्सफर केले.
advertisement
या एका चुकीमुळे प्रत्येक युजरला सरासरी 2490 बिटकॉइन मिळाले. भारतीय चलनात याची किंमत एका युजरसाठी सुमारे 1500 कोटी रुपये इतकी होती. एवढी मोठी रक्कम खात्यात दिसताच काही युजर्सनी क्षणाचाही विलंब न लावता ते बिटकॉइन विकायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, अचानक झालेल्या मोठ्या विक्रीमुळे बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली.
advertisement
कंपनीला आपली चूक लक्षात येईपर्यंत 35 मिनिटे उलटली होती. बिथमने तातडीने व्यवहार आणि पैसे काढण्यावर (Withdrawal) बंदी घातली. युद्धपातळीवर प्रयत्न करून कंपनीने 6,18,212 बिटकॉइन परत मिळवण्यात यश मिळवले. युजर्सनी विकलेल्या बिटकॉइनपैकी 93 टक्के हिस्साही परत आला. मात्र, तरीही 125 बिटकॉइन परत मिळवण्यात कंपनीला अपयश आले आहे, ज्याची किंमत आजही करोडोंमध्ये आहे.
advertisement
नुकसान भरपाई आणि बोनसची घोषणा
या गोंधळामुळे ज्या ग्राहकांचे नुकसान झाले, त्यांना बिथमने दिलासा दिला आहे. ज्यांनी घाईघाईत कमी किमतीत विक्री केली, त्यांना झालेल्या नुकसानाची १०० टक्के भरपाई मिळेल. भरपाईसोबतच कंपनी १० टक्के अतिरिक्त भरपाई देखील देणार आहे. विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी कंपनीने एक आठवड्यासाठी ट्रेडिंग फी माफ केली आहे.
advertisement
भविष्यात अशी मानवी चूक टाळण्यासाठी बिथमने आता कंबर कसली आहे. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचा वापर करणार आहे, जे अशा प्रकारच्या असामान्य व्यवहारांवर लक्ष ठेवतील आणि वेळीच सावध करतील. एका कर्मचाऱ्याच्या छोट्याशा टायपिंग मिस्टेकने कंपनीला केवळ आर्थिक फटकाच दिला नाही, तर तंत्रज्ञानाच्या युगात 'व्हेरिफिकेशन' किती महत्त्वाचे आहे, याचा धडाही दिला.
view comments
मराठी बातम्या/मनी/
एका रात्रीत करोडपती झाले 249 ग्राहक, क्रिप्टो एक्सचेंजने चूकून पाठवले 15000000000 रुपयांचे बिटकॉइन
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement