advertisement

Latur ZP Election Result : लातूरचा गड कोण राखणार? भाजप-काँग्रेसमध्ये थेट फाईट, मतमोजणीला सुरूवात

Last Updated:

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून, पहिल्या फेरीपासूनच उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

लातूरचा गड कोण राखणार? भाजप-काँग्रेसमध्ये थेट फाईट, मतमोजणीला सुरूवात
लातूरचा गड कोण राखणार? भाजप-काँग्रेसमध्ये थेट फाईट, मतमोजणीला सुरूवात
लातूर : लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून, पहिल्या फेरीपासूनच उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. देशमुखांचा गड असलेल्या लातूरमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लातूरमध्ये देशमुख विरुद्ध चाकुरकर म्हणजेच काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे.

लातूर जिल्ह्यातील महत्वाच्या लढती :

लातूर
काटगाव - काँग्रेस लातूर ग्रामीण मधील माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या सुनबाई अश्विनी दत्तात्रय शिंदे विरुद्ध लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राहिलेले नाथसिंह देशमुख यांची पत्नी पूर्वादेवी नाथसिंह देशमुख यांच्यात मुख्य लढत आहे.
आर्वी गट : मांजरा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या पत्नी राजश्री धनंजय देशमुख विरुद्ध भाजपच्या नवख्या ऍड. वैशाली लोंढे यादव यांच्या मुख्य लढत होत आहे. धनंजय देशमुख हे
advertisement
रेणापूर
भाजपचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश रमेश कराड यांनी रेनापुर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या मुलांनी, नातेवाईकांनी निवडणूक लढवू नये असे आदेश असल्यामुळे ऋषिकेश कराड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांच्या ठिकाणी आता भाजपचे सतीश रावसाहेब आंबेकर विरुद्ध मनसेचे प्रदेश तथा जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांचे बंधू सुनील गणपतराव नागरगोजे विरुद्ध काँग्रेसचे गणेश लिंबाजी तुरूप यांच्यात लढत होत आहे.
advertisement
रेणापूर तालुक्यातील कामखेडा गटातून भाजप मध्ये गेलेले काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या भावजय सरिता शंकर भिसे या निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरुद्ध त्यांच्या जाऊबाई आशाबाई शिवाजी भिसे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन दाने यांच्या आई आशा राजेंद्र दाने यांच्यात लढत होत आहे.
औसा
लोदगा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष स्वयंप्रभा पाटील विरुद्ध औसा भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचे अत्यंत विश्वासू संतोषअप्पा मुक्ता यांच्या पत्नी पूनम मुक्ता विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी यांच्या पत्नी अरुणा संतोष सोमवंशी यांच्या लढत होत आहे.
advertisement
पंचायत समिती : शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर
राज्याचे सहकार मंत्री तथा अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सुरज बाबासाहेब पाटील हे पंचायत समिती निवडणुकीत शिरूर ताजबंद गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मंगेश चंद्रशेखर पाटील.. आणि शिवसेनेचे सिद्धेश्वर सुभाष औरादे यांच्यात लढत होत आहे.
advertisement
चाकुर:
भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्या सुप्रिया सुधाकर श्रृंगारे या चाकुर तालुक्यातील रोहिणा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभ्या आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सोनिया श्रीकृष्ण नाईकवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उषा सोनकांबळे यांच्यात लढत होत आहे.,
उदगीर :
वाढवणा जिल्हा परिषद गटातून २०१७ च्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके विरुद्ध काँग्रेसचे नागोराव चिमनदरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे शंकर शेळके यांच्यात लढत होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election Result : लातूरचा गड कोण राखणार? भाजप-काँग्रेसमध्ये थेट फाईट, मतमोजणीला सुरूवात
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement