advertisement

Latur : ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकल्याने कारचा चक्काचूर, देवदर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू

Last Updated:

चार मित्र तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कारने शनिवारी रात्री निघाले होते. ते महाळंग्रा शिवाराजवळ पोहोचले असताना कारचा भीषण अपघात झाला.

News18
News18
नितिन बनसोडे, लातूर : नांदेडहून तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. ऊसाच्या ट्रॅक्टरला कारची जोराची धडक बसून झालेल्या या अपघातात चौघे जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. लातूर - नांदेड महामार्गावर महाळंग्रा शिवारात रविवारी पहाटे ३ वाजता हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके, नर्मन कात्रे या चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, चौघेही तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कारने शनिवारी रात्री निघाले होते. ते महाळंग्रा शिवाराजवळ पोहोचले असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली.
कार नर्मन कात्रे चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रॅक्टरला मागून जोराची धडक बसली. यात नर्मनसह मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम लंकाढाई हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लातूरमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर: जावयाकडून सासऱ्याचा चाकूने भोसकून खून
दारू पिऊन पती मारहाण करत असल्याने पत्नी माहेरी निघून गेली. तिला घ्यायला पती तिच्या माहेरी आल्यानंतर सासऱ्याने पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जावयाने सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना चिकलठाणा येथील धनगर गल्लीत घडली आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी जावयास अटक केली आहे. दत्ता रामराव पाटोळे असे संशयित जावयाचे तर सूर्यभान फकीरचंद रिठे असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur : ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकल्याने कारचा चक्काचूर, देवदर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement