पाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांची निराशा, सोयाबीनचा सर्वात निच्चांकी दर
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
यंदा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोयाबीनला काय दर मिळाला याची उत्सुकता शेतकऱ्यांना देखील असते पाहुयात जालना शहरातील बाजार समितीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर सोयाबीन दर काय आहेत.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्यापारी सोयाबीन कापसाची खरेदी करून खरेदीचा मुहूर्त शोधतात. यामुळे शेतकऱ्यांना देखील दिवाळी पाडव्याच्या दिवशी अधिक दर मिळत असतो. यंदा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोयाबीनला काय दर मिळाला याची उत्सुकता शेतकऱ्यांना देखील असते पाहुयात जालना शहरातील बाजार समितीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर सोयाबीन दर काय आहेत.
जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि परभणी यांसारख्या जिल्ह्यांमधून शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यासाठी घेऊन येतात. सध्या बाजार समितीमध्ये 30 ते 35 हजार क्विंटल सोयाबीनची आवक दररोज होत आहे. या सोयाबीनला आद्रतेनुसार 3500 ते 4100 प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. दिवाळी पाडवा असल्याने जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज केवळ पन्नास रुपये शिल्लक भाव मिळाला.
advertisement
यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर अधिकच्या भावाची अपेक्षा ठेवून सोयाबीन विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे पाहायला मिळालं. बाजार समितीत सोयाबीन विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला केवळ तीन हजार पाचशे रुपये एवढा निचांकी दर मिळाला. या शेतकऱ्याने बाजार समितीमध्ये सहा क्विंटल सोयाबीन विक्रीस आणले होते. सोयाबीनला हमीभावापेक्षा दीड हजार ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी असून लवकरच हमीभाव केंद्र सुरू करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 22, 2025 5:33 PM IST

