advertisement

Krushi Market Rate Today: सोयाबीनला सर्वाधिक भाव, कांदा उत्पादकांची आजही कोंडी, किती मिळाला भाव?

Last Updated:

रविवार , दिनांक 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व कांद्याची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market

मुंबई: रविवार , दिनांक 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊया. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांचे म्हणजेच सोयाबीन, मका आणि कांद्याची आवक आणि भाव पाहूया.
मक्याचे भाव कोसळले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 261 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 5 क्विंटल मक्याची आवक झाली. त्यास 2400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 256 क्विंटल मक्यास 1300 ते 1500 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
कांद्यांची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 57 हजार 315 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 17 हजार 991 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1475 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 414 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1500 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 210 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी चंद्रपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 143 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 1400 ते 3800 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 43 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 4100 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Rate Today: सोयाबीनला सर्वाधिक भाव, कांदा उत्पादकांची आजही कोंडी, किती मिळाला भाव?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement