FB मित्राकडून घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला अडकवलं जाळ्यात, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, रायगडला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Raigad: रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे.
रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडियावरील मित्राने एका विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार केले आहे. आरोपी मागील अडीच वर्षांपासून पीडितेला ब्लॅकमेल करून तिचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची ३८ वर्षीय आरोपीसोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे संबंध सुरू असताना आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य केले. त्याने महिलेसोबतचे शारीरिक संबंधांचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले, तसेच तिचे फोटोही काढले.
या छायाचित्रांचा आणि व्हिडीओचा वापर करून आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेनं निमूटपणे आरोपीचे अत्याचार सहन केले.
advertisement
या अडीच वर्षांच्या काळात आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरी आणि मुंबईतील विक्रोळी येथील स्वतःच्या निवासस्थानीही तिच्यावर अत्याचार केले. मानसिक आणि शारीरिक यातना सहन अडीच वर्ष तणावाखाली जीवन जगल्यानंतर, अखेर महिलेने हिंमत दाखवून महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ ३८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे महाड तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, महाड शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
October 21, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
FB मित्राकडून घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला अडकवलं जाळ्यात, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, रायगडला हादरवणारी घटना!