विद्यार्थ्यांचं स्टार्टअप स्वप्न पूर्ण होणार! महायुतीकडून 25 लाखांपर्यंत मदत, मोफत प्रशिक्षण; निकष काय?
- Reported by:Tushar Rupnavar
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Startup Funding : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी “मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड” अंतर्गत एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठी एक मोठी संधी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून उघडली जात आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी “मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड” अंतर्गत एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे उद्योजकतेला चालना देत राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्टार्टअप सुरू करण्याच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला सरकारचं बळ मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग 30 लाख तंत्रशिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे माहिती पाठवणार असून, त्यामधून 5 लाख विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे, निवडलेल्या 25 हजार विद्यार्थ्यांना तर 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज, तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या दोन वर्षांत कर्जफेड करण्याची आवश्यकता नाही, तसेच कर्जावर ५० टक्क्यांपर्यंत व्याज अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.
advertisement
अशी असेल निवड प्रक्रिया:
राज्यात विविध तंत्रशिक्षण पूर्ण केलेल्या 30 लाख युवक-युवतींची नोंद शासनाकडे उपलब्ध आहे. या सर्वांना ईमेलद्वारे संपर्क करून एआय आधारित प्राथमिक परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर 5 लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
या निवडीतून पुढे मूल्यांकन चाचणी, स्पर्धा व हॅकाथॉनच्या माध्यमातून फेरचाचणी घेत १ लाख विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. अंतिम टप्प्यात 25 हजार निवडक विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे, जेणेकरून सक्षम स्टार्टअप्स आणि यशस्वी उद्योजक तयार होतील.
advertisement
ही योजना केवळ नव्या स्टार्टअप्ससाठीच नाही, तर अपयशी झालेल्या स्टार्टअप्सना पुन्हा चालना देण्यासाठीही विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.यामुळे लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यातील युवा शक्तीचा पूर्ण उपयोग करून त्यांना उद्योजक बनवण्याचे हे पाऊल महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीस नवी दिशा देणारे ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 08, 2025 2:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विद्यार्थ्यांचं स्टार्टअप स्वप्न पूर्ण होणार! महायुतीकडून 25 लाखांपर्यंत मदत, मोफत प्रशिक्षण; निकष काय?








