advertisement

BJP RSS : भाजपच्या मदतीला संघाची कुमक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीसाठी प्लान ठरला

Last Updated:

BJP RSS : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक थेट मैदानात उतरणार आहेत.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनीतीची चाचपणी सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक थेट मैदानात उतरणार आहेत. रविवारी संघ आणि भाजप नेत्यांची बैठक पार पडली. त्यात नागपूर, मुंबईसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत रणनीती आखण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रविवारी (15 जून) दिवसभर नागपूरमध्ये भाजप नेते आणि संघाच्या विविध अनुषांगिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक तयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदारही या बैठकीला उपस्थित होते.
advertisement

भाजपने मांडला निवडणुकीचा रोडमॅप...

या बैठकीदरम्यान भाजपने संघ पदाधिकाऱ्यांसमोर आपला निवडणुकीचा रोडमॅप मांडला. आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला असून, मतदारांशी थेट संवाद साधून सरकारच्या योजनांची माहिती देण्याचे नियोजन आहे.

संघाची होणार भाजपला मदत...

संघाच्या माध्यमातून भाजपला बुथ स्तरावर संघटनशक्ती मिळणार आहे. यामुळे पक्षाचे नेटवर्क अधिक बळकट होईल, असा भाजपचा विश्वास आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये सरकारच्या योजनांचा प्रसार करून भाजपचा पाठिंबा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विधानसभा निवडणुकीनंतर होत आहेत. त्यामुळे विरोधकांना वरचढ होऊ देण्याची कोणतीही संधी न देण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळेच या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप आणि संघाच्या या नव्या समन्वयातून राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीतही मोठा बदल झाल्याचे दिसून आले. भाजपला चांगले यश मिळाले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP RSS : भाजपच्या मदतीला संघाची कुमक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीसाठी प्लान ठरला
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement