Buldhana News : बुलढाण्यात 'टक्कल व्हायरस'ची साथ! तीन दिवसातच केसं गायब, अज्ञात आजारानं महाराष्ट्रात खळबळ!

Last Updated:

Hair loss diseased in Buldhana : महाराष्ट्रातील बुलढाण्यात एका अज्ञात आजाराने धुमाकूळ घातला आहे. आता चक्क केस गळतीची साथ निघाल्याने आरोग्य विभागाची धावाधाव सुरू झाली आहे.

Buldhana causes rapid hair loss
Buldhana causes rapid hair loss
Rapid hair loss in Buldhana : केस गळतीमुळे मोठ्यांपासून ते आता लहान मुल देखील चिंतेत असतात. धगधगत्या आयुष्यात केस गळती हा मोठा विषय बनला आहे. प्रदुषण, बदललेली जीवनशैली यामुळे लहान मुलांपासून तरुणांना देखील याचा फटका बसतोय. अशातच जर तुम्हाला तीनच दिवसात टक्कल पडलं तर... विचार करुनच धक्का बसेल ना? होय हे खरंय... बुलढाण्यात सध्या विचित्र आजारामुळे दहशत निर्माण झाली आहे. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडल्याची समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

नेमकं प्रकरण काय?

बुलढाण्यातली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. यामध्ये नागरिकांना फक्त तीनच दिवसात टक्कल पडतंय. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पहायला मिळतंय. काही दिवसात 40 ते 50 लोकांना टक्कल पडल्याची माहिती मिळत आहे. या आजारात आधी लोकांच्या डोक्याला खाज सुटते अन् मग केस गळायला लागतात.
advertisement

आरोग्य विभाग अलर्टवर

शॅम्पू वापरणाऱ्या लोकांचे टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. पण शॅम्पू कधीच वापरला नाहीय त्यांनाही अचानक केस गळती झाली, असं नागरिकांचं म्हणणं आहे. पुरुषच नाही तर महिलांनाही या आजाराचा सामना करावा लागतोय. त्यामुळे गावातील लोक यामुळे दहशतीखाली आहेत. आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली असून नमुने गोळा केले जात आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान, सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणं, नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत अनेक नागरिक या आजाराचे बळी ठरले आहेत. अनेक तरुणांनी या आजारामुळे टेन्शन देखील आलाय. नागरिकांच्या आवाहननंतर आता राजकीय नेत्यांनी देखील या आजाराला गांभीर्याने घेतलं आहे. या आजारापासून लगेच सुटका मिळाली, अशी प्रार्थना नागरिक करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana News : बुलढाण्यात 'टक्कल व्हायरस'ची साथ! तीन दिवसातच केसं गायब, अज्ञात आजारानं महाराष्ट्रात खळबळ!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement