दलित मुस्लिमांच्या साथीने मराठ्यांचा एल्गार, आणखी काही जातींना सोबत घेऊ, 'त्यांचा' सुपडासाफ करणारच, जरांगे कडाडले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
माझी मान कापली तरी मी मागे हटणार नाही. १५०० रुपये देऊन तुम्ही आम्हाला नादी लावता का? आपली लढाई आपल्या लेकरांवर अन्याय होऊ द्यायची नाही यासाठी आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
मुंबई : गरजवंतांचा लढा असे सांगत सुरू केलेल्या आरक्षणाच्या चळवळीने राजकीय वर्तुळात उतरून सत्तेची सगळी समीकरणे बदलण्याचा चंग बांधला आहे. यासाठी कधी नव्हे ते मराठा दलित आणि मुस्लीम मतांची मोट बांधण्याचे लक्ष्य नेते मनोज जरांगे पाटील यांनी ठेवले आहे. तसेच मागास प्रवर्गातील विविध जाती, बंजारा आणि लिंगायत समाजालाही सोबत घेऊन वंचितांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत घेण्याचा मानस जरांगे यांनी बोलून दाखवला आहे. आम्ही आखलेली गणिते यशस्वी झाली तर सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरून खेचू, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
किती आणि कोणत्या जागा लढायच्या तसेच कोणते उमेदवार रिंगणात उतरवायचे, याची घोषणा मनोज जरांगे पाटील ३ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. आता पिचलेल्या समाजाने गुलामगिरी झुगारून लावायची वेळ आली आहे. वंचित समाज राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढलाय. माझा मराठा समाज एकजूट होत नव्हता, तो मी करून दाखवला, या कामात मी यशस्वी झालो, आता मराठ्यांनी यापुढे आझाद म्हणून जगावे, असे जरांगे म्हणाले.
advertisement
दलित मुस्लीम साथीला आहेत. मराठा एकगठ्ठा आहेत. मागास जातीतील लोकही येऊन भेटत आहेत. त्यामुळे आपल्या समीकरणांनुसार सगळं काही व्यवस्थित झालं तर जागा पडणार नाहीत, असे सांगत ज्यांनी आमच्या आई बहिणींवर लाठी हल्ला केला त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांचा सुपडा साफ करणारच असे इशारा जरांगे यांनी दिला.
माझी मान कापली तरी मी मागे हटणार नाही. १५०० रुपये देऊन तुम्ही आम्हाला नादी लावता का? आपली लढाई आपल्या लेकरांवर अन्याय होऊ द्यायची नाही यासाठी आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
advertisement
चार तारखेला मी सांगितल्यानंतर संबंधितांनी लगोलग अर्ज मागे घ्यावेत. मी सांगितलेला अर्जच फक्त राहिल, बाकीचे अर्ज लगोलग मागे घ्यायचे. बाकीच्या लोकांनी स्टार प्रचारक म्हणून मी सांगितलेल्या उमेदवाराचे काम करायचे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मनोज जरांगे पाटील गेली आठवडा विविध जाती धर्माच्या प्रमुख लोकांशी चर्चा करीत आहे. राज्यातील विविध मतदारसंघातील समीकरणे लक्षात घेऊन त्यानुसार गणितांची आखणी करीत आहेत. किती, कोणते आणि कुठे उमेदवार द्यायचे, यासंबंधीचा निर्णय ते लवकरच जाहीर करणार आहेत.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Oct 31, 2024 4:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दलित मुस्लिमांच्या साथीने मराठ्यांचा एल्गार, आणखी काही जातींना सोबत घेऊ, 'त्यांचा' सुपडासाफ करणारच, जरांगे कडाडले











