Gunaratna Sadavarte : '...म्हणून तुम्हाला ओबीसींमध्ये जाता येणार नाही', गुणरत्न सदावर्तेंची Uncut मुलाखत
- Published by:Shreyas
Last Updated:
गुणरत्न सदावर्तें यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायला विरोध केला आहे. यानंतर गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक झाला, यानंतर त्यांच्या गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. या वादाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली.
मुंबई, 28 ऑक्टोबर : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करावा, यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, पण गुणरत्न सदावर्तें यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायला विरोध केला आहे. यानंतर गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक झाला, यानंतर त्यांच्या गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. या वादाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात कोणत्या अडचणी आहेत, ते सांगितलं.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
'मी कोणत्याही जातीचा आकस ठेवणारा माणूस नाही. संविधानात डॉक्टर आहे. मला कोणत्याही जातीविरुद्ध मत्सर, राग नाही. माझी भूमिका 50 टक्क्यातल्या खुल्या वर्गातल्या जागा गुणवंतांसाठी आहेत, अशी आहे. 50 टक्क्यांव्यतिरिक्त आरक्षणाची तरतूद सामाजिक मागासलेपणासाठी आहे, आर्थिक मागासलेपणासाठी नाही. गुणवंतांवर अन्याय होऊ नये, अशी माझी भूमिका आहे,' असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
advertisement
'तीन आयोगांनी मराठा समाजाचं मागासलेपण नाकरालं. मराठा समाजाची गावकुसाबाहेरची परिस्थिती आहे का? मंदीर प्रवेश बंदी आहे का? ही मागासलेपणाची लक्षण आहेत. मागास ठरत नाही म्हणून तुम्हाला ओबीसींमध्ये जाता येणार नाही', असं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं. 'मोदींनी खुल्या वर्गात 10 टक्के जागा आर्थिकदृष्ट्या मागसलेल्यांना दिल्या आहेत. यातल्या 85 टक्के जागा नोकऱ्यांच्या बाबतीत ईडब्ल्यूएसमध्ये मराठ्यांनी घेतल्या आहेत. 75 टक्के जागा शिक्षणात मागासलेपणाच्या घेतल्यात. गरिबी हटाव हा कार्यक्रम आरक्षण नाही. 50 टक्के जागा गुणवंतांसाठी जागा राहिल्या पाहिजे हा माझा उद्देश आहे', असंही सदावर्ते म्हणाले.
advertisement
'संदीप शिंदे यांची कमिटी कंटेम्पट आहे. कमिटीकडे किती वंजारा, मातंग, धनगरांना बोलावलं आहे, पुरावे योग्य आहेत का अयोग्य आहेत ते पाहण्यासाठी? शिंदेंची समितीही कुणाला मागास डिक्लेअर करू शकत नाही. शिंदे समितीच्या निर्णयाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्रही देता येणार नाही. कारण समिती मागासवर्गीय आयोग आहे का? ती फक्त समिती आहे, आयोगही नाही', असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
advertisement
'आरक्षण नसलेल्या 50 टक्क्यांची मतं तुम्हाला नकोयत का? त्यांना तुम्ही भारतीय नागरिक मानत नाही का? असा प्रश्नही गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना विचारला आहे.
'देवेंद्रजींना मी श्रद्धेय मानतो. कुणाला आवडता नेता असू शकतो. मराठा आरक्षण देवेंद्रजींनी दिलं होतं, त्याला जयश्री पाटील, एलके पाटील यांनी विरोध केला. आम्ही ते मुख्यमंत्री असताना लढलो. आमच्यावर हल्ले झाले. त्यांची भूमिका मराठ्यांना आरक्षण द्यायची होती, आमची आरक्षण देता येत नाही अशी भूमिका होती. हायकोर्टात हरलो, सुप्रीम कोर्टात लढलो आणि जिंकलो', असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2023 10:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gunaratna Sadavarte : '...म्हणून तुम्हाला ओबीसींमध्ये जाता येणार नाही', गुणरत्न सदावर्तेंची Uncut मुलाखत