Video: झिरवाळांच्या कार्यालयात वसुली कशी चालायची? नवी माहिती समोर, २ रेषा मारल्या की १ लाख द्यायचे!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसीबीने धाड घातल्यानंतर सगळीकडेच खळबळ उडाली होती.
कृष्णा औटी, प्रतिनिधी, मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाच घेतल्याने पकडण्यात आल्याने मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी केल्या आहेत. असे असताना यामध्ये आता एक नवीन प्रकरण समोर आले असून मेडिकल व्यवसायिक निर्मल शर्मा यांनी आपल्याकडेही नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात असणारे राजू ढेंगरे आणि रामदास गाडे यांनी आपल्या मेडिकलचा परवाना सुरू ठेवण्यासाठी ५५ हजार रुपयाची लाच घेतल्याचे म्हणणे आहे. याबाबतचे एक स्टिंग ऑपरेशन देखील त्यांनी केले आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसीबीने धाड घातल्यानंतर सगळीकडेच खळबळ उडाली होती. एसीबीने 12 फेब्रुवारीला हरिराम घाची यांनी केलेल्या तक्रारीनंतर एसीबीने धाड घातली होती. पण त्याआधी आपण आपल्या मेडिकलचा परवाना नूतनीकरण करून मिळावा यासाठी ५५ हजार रुपये दिल्याने त्याचे आपण स्टिंग ऑपरेशन करत याबाबतची तक्रार आपण मुख्यमंत्री कार्यालयात देखील केली असल्याचं त्यांनी सांगितले.
advertisement
https://youtu.be/rSyiHOaRCN0
एक रेषा म्हणजे ५० हजार, दोन रेषा म्हणजे १ लाख
निर्मल शर्मा यांनी सांगितले, एका महिन्यासाठी परवाना निलंबित झाला होता. त्यानंतर रामदास गाडे यांनी माझी फाईल किंवा पेपर न बघता माझ्या फाईलवर दोन रेषा मारल्या आणि म्हणाले,'राजू यांचं काय ते तुम्ही बघून घ्या' त्या लाईन म्हणजे गाडे आणि ढेरिंगे त्यांचातील सिक्रेट कोडवर्ड होता. एक रेषा म्हणजे ५० हजार, दोन रेषा म्हणजे १ लाख. ज्यांच्या पेपरवर एक रेष आहे, त्यांच्याकडून 50 हजार घ्यायचे, ज्यांच्या पेपरवर दोन लाईन आहेत, त्यांच्याकडून एक लाख घ्यायचे, असे त्यांचे ठरलेले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 6:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: झिरवाळांच्या कार्यालयात वसुली कशी चालायची? नवी माहिती समोर, २ रेषा मारल्या की १ लाख द्यायचे!






