शिंदेंच्या आमदाराने बोगस मतदार आणले? फडणवीसांच्या मंत्र्याचा गंभीर आरोप, रोहित पवारांकडून Video ट्विट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आमदार संजय गायकवाड यांनी हजारो बोगस मतदार आणले असून ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे, असा आरोप मंत्री आकाश फुंडकर यांनी केला आहे.
बुलढाणा: कोकणात राणे बंधूंमध्ये राजकीय शिमगा सुरू असताना शिंदे-भाजपमधला संघर्ष उफाळून आलेला आहे. राणे बंधूंमधील वाद हा भाजप सेनेतले शीतयुद्ध असल्याचे सांगितले जाते. इकडे बुलढाण्यातही फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आकाश फुंडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा नगरपालिकेसाठी होत असलेल्या मतदानासाठी ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने बोगस मतदार शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आणले असल्याचा गंभीर आरोप कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलाय.
संजय गायकवाड यांनी बोगस मतदार आणले?
advertisement
आमदार संजय गायकवाड यांनी हजारो बोगस मतदार आणले असून ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे. बुलढाण्यात गुंडाराज सुरू आहे. ग्रामीण भागातून बोगस मतदार आणले जात आहेत, असा आरोप कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलाय.
निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणेने बोगस मतदारांचे प्रकरण कठोरपणे हाताळले पाहिले आणि मतदारयाद्या तपासून मतदारांची पडताळणी केली पाहिजे. शक्य झाले तर बोगस मतदान ज्या ज्या ठिकाणी झाले आहे, तेथील निवडणुका रद्द करा किंवा पुर्नमतदान घ्या, अशी मागणी आकाश फुंडकर यांनी केली आहे.
advertisement
आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते… pic.twitter.com/EV0b8q8KRB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 2, 2025
advertisement
त्यांना पकडला असतं पण... रोहित पवार यांचा संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता इशारा
आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने पोलिसांशी हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावले. यावरून सत्ताधारी लोक मतदान प्रक्रियेत दिवसाढवळ्या किती घोळ घालत आहेत हेच दिसून येतं. सत्ताधारी लोक सातत्याने बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया प्रभावित करत असून आयोग मात्र झोपा काढत आहे. मालकांविरोधात काहीच करायचं नाही, हे आयोगाने ठरवलंय का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेंच्या आमदाराने बोगस मतदार आणले? फडणवीसांच्या मंत्र्याचा गंभीर आरोप, रोहित पवारांकडून Video ट्विट


