अजितदादांचे अपघातादिवशीचे CCTV फुटेज देण्यास नागरी विमान वाहतूक विभागाचा नकार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतरही केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने नितीन यादव यांनी मागवलेली माहिती नाकारली आहे.
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली होती. परंतु संबंधित सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई विमानतळ प्रशासन तसेच नागरी विमान विभागाने नकार दिला आहे.
अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्या अनुषंगाने राज्यभरातील जनतेत आणि अजित पवार यांना मानणाऱ्यांमध्ये अपताघाच्या अनुषंगाने काही शंका आहेत. त्यामुळेच दादांचा अपघात झाला त्या दिवसाचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, या दृष्टीने नितीन यादव यांनी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागास दि.२८/०१/२०२६ रोजीचे मुंबई विमानतळावरील पहाटे ६ ते सकाळी ९ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. यात धक्कादायक असे की अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतरही केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने यादव यांनी मागवलेली माहिती नाकारली आहे.
advertisement
यामुळे आदरणीय अजितदादांचा खरोखरच घात झाला का हा मोठा प्रश्न यामुळे पडत असल्याचे नितीन यादव म्हणाले. नागरी विमान वाहतूक विभागाच्या निर्णयाविरोधात यादव यांनी पुढे अपील केले असून यात सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय माहिती आयुक्त यांचे जजमेंट देऊन पुन्हा फुटेजची मागणी केली आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना देखील आजच माहिती अधिकाराद्वारे मुंबई येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानपासून ते मंत्रालयपर्यंतचे मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडे असणारे अजितदादांचे २८/०१/२०२६ रोजची पहाटे ६ ते सकाळी ९ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे.
advertisement
अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून संविधानिक पदावर काम करणारे लोकप्रतिनिधी तसेच शासकीय जनसेवक म्हणून कार्यरत असल्याने केंद्रीय विमान वाहतूक विभागाने जे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज नाकारले आहे ते धक्कादायक असून त्यांनी तात्काळ अजितदादांचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करावे अशी माझी मागणी आहे, असे यादव म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 9:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचे अपघातादिवशीचे CCTV फुटेज देण्यास नागरी विमान वाहतूक विभागाचा नकार







