Shiv Jayanti 2026 : कलेतून उजळला स्वराज्याच्या विरांगनांचा इतिहास, हा Video पाहाच
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यातील स्वराज्य रथयात्रेमध्ये कोंडे देशमुख रथांमध्ये स्वराज्य लक्ष्मी म्हणजे वीरपत्नी आणि अज्ञात गुप्तहेर विरांगणा यांना चित्राद्वारे सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे : महाराष्ट्रासह देशभरात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यात देखील महाराजांची 396 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. पुण्यातील स्वराज्य रथयात्रेमध्ये कोंडे देशमुख रथांमध्ये स्वराज्य लक्ष्मी म्हणजे वीरपत्नी आणि अज्ञात गुप्तहेर विरांगणा यांना चित्राद्वारे सन्मानित करण्यात आले आहे. या रथाविषयी गिरीजा कोंडी देशमुख यांनी माहिती सांगितली आहे.
गिरीजा कोंडी देशमुख यांनी सांगितले की, शिवजयंती हा आपल्या गौरवशाली इतिहासाचा, स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभं केलेल्या स्वराज्यासाठी अनेक शिलेदारांनी तन, मन आणि धन अर्पण केले. त्यांच्या या त्यागाचा सन्मान करण्यासाठी यंदाच्या शिवजयंती उत्सवात कलाविष्कार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून स्वराज्याच्या महत्त्वाच्या शिलेदारांच्या वीरपत्नी आणि अज्ञात गुप्तहेर विरांगणांचे सुंदर चित्र साकारले आहे.
advertisement
ही केवळ चित्रे नसून वीरपत्नी, वीरमाता आणि वीरकन्या यांच्या त्यागाला मानवंदना देणारा हा एक प्रयत्न आहे. कलाविष्कार अकॅडमीने साकारलेल्या या चित्रांमधून पडद्यामागे राहून स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा त्याग आणि शौर्य समाजासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
कलेतून उजळला स्वराज्याच्या विरांगनांचा इतिहास
ही कलाकृती अवघ्या 48 तासांत पूर्ण करण्यात आली. यामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम आणि समर्पण आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी उमाबाई मालोजीराजे भोसले, हिरकणी गवळी, दीपाऊ बाई बांदल देशमुख, बुबाई बाई कोंडे देशमुख, भीमाई उर्फ अंबाई बाई बाजी पासलकर, लक्ष्मीबाई बाजीप्रभू देशपांडे, मंजुळा उर्फ शारदाबाई बहिर्जी नाईक, लक्ष्मी उर्फ स्वरूपाबाई हंबीरराव मोहिते, सावित्रीबाई देसाई, गुणवंताबाई येसाजी कंक, उमाबाई बजाजी निंबाळकर, धाराऊ आणि जानकीबाई प्रतापराव गुजर या सर्व विरांगनांना चित्ररूपातून मानवंदना देण्यात आली आहे. या चित्रांमधून त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 8:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Shiv Jayanti 2026 : कलेतून उजळला स्वराज्याच्या विरांगनांचा इतिहास, हा Video पाहाच






