परभणी पेटले, CM फडणवीसांना फोन केला पण त्यांच्या PA ने फोन उचलला, खासदार बंडू जाधव यांची प्रतिक्रिया
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Parbhani News : परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे माथेफिरूने नुकसान केल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. परंतु त्यांच्या स्वीय सहाय्यकाने फोन उचल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी बुधवारी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही, त्यामुळे आंदोलनाने रौद्ररुप धारण केल्याचा आरोप जाधव यांनी केला.
परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु तेथील परिस्थिती हाताळण्यास पोलीस प्रशासन कमी पडले. पोलिस अधीक्षक सुट्टीवर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांशी संपर्क करूनही त्यांनी आवश्यक प्रतिसाद दिला नाही, असे सांगत घटनेच्या मागे कुणीतरी मोठी शक्ती असावी, असा संशय खासदार जाधव यांनी व्यक्त केला.
आंबेडकरी अनुयायांना खासदार बंडू जाधव यांची कळकळीची विनंती
advertisement
जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व बांधवांना विनंती करतो की, काल झालेली घटना ही दुर्दैवी व अत्यंत संतापजनक अशी आहे. झालेल्या घटनेचा निषेध करतो, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करतो. मात्र आपण सर्वजण निषेध व्यक्त करत असताना शांततेच्या मार्गाने बंद पाळावा अशी कळकळीची विनंती खासदार जाधव यांनी केली आहे. जे नुकसान होत आहे ते परभणीमधील जनतेचे आणि मालमत्तेचे होत आहे. आंदोलन करताना शांततेच्या मार्गाने करा. आंदोलन करताना कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका, अशी विनंती खासदार जाधव यांनी आंबेडकरी अनुयायांना केली.
advertisement
बटेंगे तो कटेंगेचा परभणीत काय विषय आहे? काल घोषणा दिल्या गेल्या, घटनेमागे मोठ्या शक्तीचा हात
काल परभणीमध्ये बांगलादेशामधील घटनेच्या अनुषंगाने मोर्चा निघाला होता. बटेंगे तो कटेंगेचा परभणीत काय विषय आहे? तशा घोषणा परभणीत दिल्या गेल्या. काल घडलेल्या घटनेमागे कोणीतरी मोठी शक्ती असावी, असा संशय जाधव यांनी व्यक्त करीत पोलीस प्रशासनाने अधिक लक्ष घालून तपास करण्याची गरज बोलून दाखवली.
view commentsLocation :
Parbhani,Maharashtra
First Published :
December 11, 2024 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परभणी पेटले, CM फडणवीसांना फोन केला पण त्यांच्या PA ने फोन उचलला, खासदार बंडू जाधव यांची प्रतिक्रिया


