Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील 10 नोव्हेंबरला पुन्हा मुंबईत, पोलिसांनी धाडली नोटीस

Last Updated:

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस धाडली आहे.

News18
News18
मुंबई :  मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येची सुपारी दिल्याच्या बातमीनं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या अडचण वाढली आहे. मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबईतील आझाद नगर पोलीसांनी नोटीस जारी केली आहे. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीशीत जरांगे पाटलांना 10 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मार्च-एप्रिलमध्ये मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि आणखी काही सहकाऱ्यांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. यात तपासाच्या अनुशंगाने चौकशी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे

नेमकं काय म्हटलं आहे नोटीसीमध्ये?

२१ एप्रिल रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ३७(३), ३८,१३५,१३६ म.पो.का.या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान हे निष्पन्न झाले आहे की, या गुन्ह्यात तपासाच्या अनुषंगाने तथ्य आणि वस्तुस्थिती जाणून
advertisement
घेण्यासाठी तुमच्याकडे विचारपूस करण्यासाठी सबळ व वाजवी कारणे आहेत. त्यामुळे तुम्ही 10 नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वा. आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक ते
तथ्ये समोर मांडण्यासाठी उपस्थित राहुन गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करावे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

  • मनोज जरांगे पाटील
  • पांडुरंग तारक
  • गंगाधर काळकुटे नाना
  • चंद्रकांत भोसले
  • वीरेंद्र पवार
  • प्रशांत सावंत
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा मोर्चा मध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांनी 27 ऑगस्टपासून आझाद मैदान येथे साखळी उपोषण केले होते. या साखळी उपोषणात आरक्षणासोबतच जे आंदोलन झाले आहेत त्यामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या सर्व लोकांवरील गुन्हे सरकारकडून मागे घेण्यात यावे अशीच मागणी देखील या साखळी उपोषणमध्ये करण्यात आली होती. 2 सप्टेंबरला सरकारच्या शिष्टमंडळाकडून आश्वासन देण्यात आले होते की सर्व गुन्हे मागे घेतले जातील. 10 नोव्हेंबरला आझाद मैदान येथे उपस्थित राहण्याची नोटीस आझाद मैदान पोलिसांकडून बजावण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील 10 नोव्हेंबरला पुन्हा मुंबईत, पोलिसांनी धाडली नोटीस
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement