Bigg Boss Marathi 6 Elimination: BB Marathi 6: वोटिंगमध्ये सर्वात मागे, प्रेक्षकांचीही पाठ, सलग दुसऱ्यांदा डेंजर झोनमध्ये! आज कुणाचा गेम ओव्हर होणार?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Elimination: सोनाली राऊत आणि त्यानंतर दिव्या शिंदे बाहेर पडल्यानंतर आता चौथ्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: 'बिग बॉस मराठी सीझन ६' आता अत्यंत रंजक वळणावर आला आहे. पहिल्या काही आठवड्यांत राधा पाटील, सोनाली राऊत आणि त्यानंतर दिव्या शिंदेला घरा बाहेर काढल्यानंतर आता चौथ्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आठवड्यात तब्बल ९ स्पर्धक 'डेंजर झोन'मध्ये आहेत. बिग बॉसच्या घरात धमकी दिल्याच्या कारणाने दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे आज कोण बाहेर पडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
९ स्पर्धक नॉमिनेटेड, कोणाला मिळतायत सर्वाधिक मतं?
या आठवड्यात राकेश बापट, सचिन कुमावत, शेळके, दिपाली सय्यद, ओंकार राऊत, अनुश्री माने, प्रभू शेळके, रोशन भजनकर आणि आयुष संजीव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
ऑनलाइन वोटिंग ट्रेंड्सनुसार, रोशन भजनकर आणि सचिन कुमावत यांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत असून ते सुरक्षित असल्याचे चित्र आहे. राकेश बापट हा मोठा चेहरा असल्याने तो इतक्या लवकर बाहेर जाण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अनुश्री माने आणि दिपाली सय्यद यांची स्थितीही सध्या तरी स्थिर आहे.
advertisement
कोणाच्या डोक्यावर टांगती तलवार?
वोटिंग ट्रेंड्समध्ये सर्वात शेवटी आयुष संजीव आणि ओंकार राऊत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यातही घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. या आठवड्यात मात्र, सोशल मीडियावर आयुष संजीवच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कोण जाणार आज घराबाहेर?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वरील एका चर्चेनुसार, आयुष संजीव या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतो. तर, काहींच्या मते ओमकार राऊत बाद होण्याची शक्यता अधिक आहे. आयुषला दुखापत झाल्याने तो घराबाहेर पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे सलग दुसऱ्या आठवड्यातही ओमकार राऊत हा डेंजर झोनमध्ये आहे. त्यामुळे तो घराबाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे आयुष संजीव खरोखरच बाहेर पडणार की ओंकार राऊतचा प्रवास संपणार, हे 'भाऊचा धक्का' एपिसोडमध्येच स्पष्ट होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 10:09 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 Elimination: BB Marathi 6: वोटिंगमध्ये सर्वात मागे, प्रेक्षकांचीही पाठ, सलग दुसऱ्यांदा डेंजर झोनमध्ये! आज कुणाचा गेम ओव्हर होणार?








