Green Tea Side Effects : ग्रीन टी तुमचं लिव्हर तर डॅमेज करत नाहीये ना? वाचा डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
तुम्ही दिवसातून किती वेळा ग्रीन टी पिता याला अतिशय महत्व आहे. तुमच्या आहारात कोणते पदार्थ असतात, तुम्हाला काही औषधं सुरू आहे का, हे लक्षात घेऊन ग्रीन टीचं प्रमाणं ठरवणं गरजेचं असतं.
मुंबई : ग्रीन टी पिणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळले अनेक जण चहाऐवजी ग्रीन टीकडे वळले आहेत. परंतु तुम्ही दिवसातून किती वेळा ग्रीन टी पिता याला देखील अतिशय महत्व आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात कोणते अन्नपदार्थ असतात, तुम्हाला काही औषधं सुरू आहे का हे लक्षात घेऊन तुम्ही ग्रीन टी पिण्याचं प्रमाणं ठरवणं गरजेचं असतं.
तुमच्या आहरात व्हिटॅमिन ईचं प्रमाण आधीच जास्त असेल तर तुम्ही ग्रीन टी जास्त पिणं हानिकारक ठरू शकत. यामुळं तुमच्या लिव्हरवर विपरित परिणाम होऊ शकतात. डर्मॅटोलॉजिस्ट डॉ. तन्वी वैद्य यांनी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आहे. डॉ. तन्वी वैद्य यांनी त्यांच्या इंस्टा अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी ग्रीन कोणत्या परिस्थितीत लिव्हरसाठी हानिकारक ठरू शकते याची माहिती दिली आहे.
advertisement
ग्रीन टीबद्दल काय आहे तज्ज्ञांचं मत..
डॉ. वैद्य यांनी सांगितलं की, तुम्ही जास्त प्रमाणात ग्रीन टी पित असाल तर ते तुमच्या यकृतासाठी म्हणजेच लिव्हरसाठी हानिकारक ठरू शकतं. तुम्ही दिवसातून एकापेक्षा जास्त कप ग्रीन टी पित असाल किंवा तुम्ही ग्रीन टी चे सप्लिमेंट तुमच्या मल्टिव्हिटॅमिनमध्ये घेत असाल तर ते हानिकारक ठरू शकतं. कारण ग्रीन टीचे अॅक्टिव्ह इन्ग्रेडिएंट्स ईसीजीसीच्या 800 पातळीच्या वर असतात आणि त्यामुळे लिव्हर एन्झाइम एलिव्हेशन होऊ शकतं म्हणजेच यकृतातील विकारांची वाढ होऊ शकते आणि तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं.
advertisement
डॉ. तन्वी वैद्य यांनी हे देखील स्पष्ट केले की, तुम्ही आधीच अॅस्पिरिनवर असाल किंवा ब्लड थिनर घेत असाल आणि त्यात तुम्ही अति प्रमाणात व्हिटॅमिन ई सप्लिमेंट घेतले तर तुमचं ब्लिडिंग रिस्क वाढू शकतं. तसेच तुमच्या शरीराला गरज नसताना तुम्ही अतिप्रमाणात व्हिटॅमिन ई घेतले तर त्यामुळे तुमच्या आट्रीज म्हणजेच धमन्या जाड होऊ शकतात. त्यामुळे सर्व सप्लिमेंट सर्वांनीच घेणं गरजेचं नसतं. तुम्हाला जेव्हा जेवढी गरज आहे, तेवढीच सप्लिमेंट घेणं फायदेशीर असतं. तसंच कोणतेही सप्लिमेंट घेण्याआधी तुमच्या डॉक्टारांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आहारात कोणताही मोठा बदल करू नका.
advertisement
advertisement
डॉ. तन्वी वैद्य यांनी सांगितलं की, तुम्हाला ऑनलाइन दिसणारा प्रत्येक सप्लिमेंट तुमच्या शरीराला खरोखर आवश्यक असतोच असे नाही. खरं तर, आजकाल क्लिनिकमध्ये आम्हाला ओव्हर-सप्लिमेंटेशन वाढताना दिसत आहे. लोक त्यांच्या कमतरता न समजून अनेक व्हिटॅमिन्स घेतात. परंतु जास्त प्रमाणातील सप्लिमेंट्स फक्त “शरीरातून बाहेर टाकले जातात” असे नाही. ते तुमच्या त्वचेवर, पचनसंस्थेवर आणि एकूण आरोग्यावरही परिणाम करू शकतात. सप्लिमेंट्स हे ट्रेंड म्हणून नाही, तर गरजेनुसार घ्यायला हवेत आणि शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 10:18 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Green Tea Side Effects : ग्रीन टी तुमचं लिव्हर तर डॅमेज करत नाहीये ना? वाचा डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं..









