advertisement

Ajit Pawar : 'अहो...माझी काय औकात', साहेबांबद्दलची माया पातळ नव्हती, श्रद्धांजली वाहताना पीएने हुंदके देत सांगितलं अजितदादांचं ग्रेटनेस

Last Updated:

शरद पवारांचे खासगी सचिव सतीश राऊत यांनी देखील अजित पवारांची आठवण शेअर केली आहे.

News18
News18
२८ जानेवारी रोजी अजित पवारांचं अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता अनेक ठिकाणी शोकसभा होत आहेत. दादांबद्दलच्या कटू-गोड आठवणी सांगितल्या जात आहेत. दरम्यान, शरद पवारांचे खासगी सचिव सतीश राऊत यांनी देखील अजित पवारांची आठवण शेअर केली आहे. अजित दादा किती लहान गोष्टी लक्षात ठेवायचे. पक्ष फुटला तरी शरद पवारांची कसे अप्रत्यक्ष काळजी करायचे, याची आठवण सांगितली आहे.
अजित पवारांची आठवण सांगताना सतीश राऊत यांनी सांगितलं की, मी शरद पवारांचा ओएसडी म्हणून रुजू झालो. दादांची एक धडाडी असायची. त्यांना लांबून पाहिलं तरी धडकी भरायची. त्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याचं धाडस होत नसायचं. परंतु मी साहेबांची इमानेइतबारे सेवा करतो, याचं दादांना मोठं अप्रूप होतं. याचा साक्षात्कार मला फार उशीरा झाला. दादांचा स्पीड खूप असायचा. साहेबांच्या कार्यालयात जायचं झालं, तरी ते एकदम भरधाव वेगाने जायचे. त्यांना नमस्कार करेपर्यंत दादा आतमध्ये पोहोचलेले असायचे. इतकी धडाडी त्या माणसामध्ये होती."
advertisement
"आपण त्यांच्या गिनतीत आहोत की नाही? याची देखील शंका माझ्या मनात असायची. पण एकेदिवशी अशाच एका आमदारांचा मला फोन आला. तुमच्याबद्दल दादा खूप चांगलं बोलत होते, असं त्यांनी मला सांगितलं. मी दादांना नमस्कार केला तरी दादा वेगानं निघून जातात. अशा स्थितीत माझी तिथे मोजदाद आहे का? असा प्रश्न मला पडला. आमदारांना खासदारांना अडचणीत आणायचं असेल तर त्यांचे पीए लोक अडचणीत आणतात, असं दादा बोलत होते. माझ्या कारकि‍र्दीत मी चार पाच चांगले पीए पाहिले. त्यात त्यांनी किशोर राजेनिंबाळकरांचं नाव घेतलं, त्यानंतर म्हणाले, आमच्या साहेबांकडे आहेत ते राऊत..." असं त्यांनी माझं कौतुक केलं होतं.
advertisement
सतीश राऊत पुढे म्हणाले, "सगळ्यांना वाटतं ते कडक होते, पण कडक माणूस अजिबात निष्ठूर नसतो, प्रचंड भावनाविवश होणारा असतो. मागच्या कृषक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दादा आणि साहेब एकमेकांकडे पाहत नव्हते. ही बाब दोघांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना खटकली होती. मलाही खटकली. यानंतर मी दादांच्या जवळच्या एका व्यक्तीकडे म्हटलं की, दादा आणि साहेबांनी एकमेकांकडे पाहिलं नाही, कसं तरी वाटलं. या घटनेनंतर १५ व्या दिवशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दादा आले. ते हेलिकॉप्टरमधून उतरले. धडधड वेगात थेट साहेबांच्या केबिनमध्ये गेले आणि २० मिनिटं संवाद केला. त्यानंतर हा प्रसंग बघून मला खूप बरं वाटलं, १५ दिवसांपूर्वी हा प्रसंग घडला आणि आज दादा साहेबांसोबत बोलत आहेत."
advertisement
"दादा एवढ्यावर थांबले नाहीत, दादाचं ग्रेटनेस किती होतं ते सांगतो, रात्री त्या कार्यकर्त्याचा मला फोन आला, त्याने सांगितलं, दादा विचारत होते तुमच्या दोस्ताला विचारलं का मी आज कसा वागलो? अहो... माझी काय औकात आहे हो... मी फक्त मनातलं मोकळं केलं होतं. पण दादांनी ती बाब लक्षात ठेवली, १५ दिवसानंतर ते साहेबांसोबत २० मिनिटं बोलले आणि संध्याकाळी पोहोच पावती देखील दिली," असा किस्सा सतीश राऊत यांनी सांगितला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : 'अहो...माझी काय औकात', साहेबांबद्दलची माया पातळ नव्हती, श्रद्धांजली वाहताना पीएने हुंदके देत सांगितलं अजितदादांचं ग्रेटनेस
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement