अटक केल्याचा राग, आरोपीचा पोलीस स्टेशनला फोन, तुमची घरं बॉम्बने उडवतो, नागपूरमधील घटना

Last Updated:

Nagpur News: पोलिस वसाहत उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला काटोल पोलिसांनी अटक केली.

नागपूर- काटोल पोलिसांकडून आरोपीला अटक
नागपूर- काटोल पोलिसांकडून आरोपीला अटक
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील काटोल पोलीस स्टेशन तसेच नागपूर ग्रामीण पोलिस वसाहत उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एकाला काटोल पोलिसांनी अटक केली. चेतन रामदास बानाईत असे या 32 वर्षीय व्यक्तीचे नाव असून तो काटोल तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.
मंगळवारी रात्री त्याने 112 या नंबरवर फोन करत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. पहिला फोन केला तेव्हा त्याने काटोल पोलीस स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या फोनवर नागपूर ग्रामीण पोलीस राहत असलेली वसाहत बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली होती.
काटोल पोलिसांनी लागलीच त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. कोर्टाच्या आदेशानुसार पुढील तपासला पोलिसांनी सुरुवात केली आहे. मागील महिन्यात काटोल पोलिसांनी चेतनला अमली पदार्थ सेवन केल्यामुळे अटक केली होती. त्याच गोष्टीचा राग चेतनच्या मनात होता. त्याने काल रात्री फोन करत चक्क पोलीस स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अटक केल्याचा राग, आरोपीचा पोलीस स्टेशनला फोन, तुमची घरं बॉम्बने उडवतो, नागपूरमधील घटना
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement