Nagpur Ring Road: मोठी बातमी! नागपुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, लवकरच 'रिंग रोड' होणार, कसा आहे प्लॅन?

Last Updated:

Nagpur News: महाराष्ट्र सरकारने नागपूरकरांसाठी मोठं गिफ्ट दिलंय. त्यामुळे लवकरच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मोठी बातमी! नागपुरातील कोंडीचा प्रश्न सुटणार, ‘आउटर रिंग रोड’ होणार, कसा आहे प्लॅन?
मोठी बातमी! नागपुरातील कोंडीचा प्रश्न सुटणार, ‘आउटर रिंग रोड’ होणार, कसा आहे प्लॅन?
नागपूर: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शहराभोवती बाह्य वळण रस्ता (आउटर रिंग रोड) व त्यालगत चार वाहतूक बेट (ट्रक ॲण्ड बस टर्मिनल) विकसित करण्याच्या प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नागपूर शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या अमरावती राष्ट्रीय महामार्ग, हिंगणा राज्यमार्ग, समृद्धी महामार्ग, हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, उमरेड राष्ट्रीय महामार्ग, भंडारा राष्ट्रीय महामार्ग, भोपाळ राष्ट्रीय महामार्ग, काटोल राष्ट्रीय महामार्ग, जबलपूर राष्ट्रीय महामार्ग या सर्व महामार्गांना जोडणारा नागपूर शहराभोवतीचा सुमारे 148 कि.मी. लांबीचा व 120 मी. रुंदीचा बाह्य वळण मार्ग व चार ठिकाणी ट्रक व बस टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे. नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
advertisement
नागपूरमधील या नव्या प्रकल्पास महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. या बाह्य वळण रस्त्यामुळे समृद्धी महामार्ग व इतर जिल्ह्यांतून नागपूरकडे येणारी तसेच नागपूर शहरातून समृद्धी महामार्गाकडे होणारी अवजड वाहतूक रहिवासी क्षेत्राच्या बाहेरून परस्पर वळविणे शक्य होणार आहे. यामुळे शहरात उद्भवत असलेले वाहतूक कोंडीचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
advertisement
बाह्य वळण मार्ग, ट्रक व बस टर्मिनल प्रकल्पासाठीच्या करारांसाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुसाध्यता अहवालानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी येणाऱ्या 13 हजार 748 कोटी रुपये एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या एकूण किमतीपैकी भूसंपादनासाठी हुडको मार्फत 4 हजार 800 कोटी रुपये इतके कर्ज उभारण्यास व या कर्जासाठी राज्य शासनाची हमी देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाकरिता उर्वरित आवश्यक रक्कम 8 हजार 948 कोटी इतका निधी राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य म्हणून प्राधिकरणास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
advertisement
सुकाणू समितीची स्थापना
या प्रकल्पासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (नवि-1) यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये विभागीय आयुक्त, नागपूर; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन; आयुक्त, नागपूर महानगरपालिका; जिल्हाधिकारी, नागपूर; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर; अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर; सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सह संचालक, नगर रचना, नागपूर हे सदस्य असतील तर महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे सदस्य सचिव असतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Ring Road: मोठी बातमी! नागपुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, लवकरच 'रिंग रोड' होणार, कसा आहे प्लॅन?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement