sana khan murder case : सना खान हत्या प्रकरणाची मोठी अपडेट,अखेरीस मृतदेहाचा लागला शोध
- Published by:sachin Salve
Last Updated:
Sana Khan Case Update : भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर, 16 ऑगस्ट : भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सना खान यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सिहोरी ग्राम इथं नर्मदा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
मागील 2 ऑगस्टपासून सना खान बेपत्ता होत्या. या प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेरीस या प्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असताना त्याने सना खान यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.
advertisement
अमित शाहू याने सना खान यांची हत्या करून मृतदेह जबलपूर येथील हिरण नदीत फेकला होता. हिरण नदीतून मृतदेह वाहत नर्मदा नदीत गेला. सना खान यांच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेशात नेऊन मृतदेहाची ओळख पटविणार आहे. मात्र हा मृतदेह सना खान यांचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
का केली हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचं समोर येतंय. अमित साहूने पत्नीकडून 50 लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. 2 ऑगस्टला नागपूरहून जबलपूरला आली होती. तिथे येताच ती अमितच्या घरी गेली. दोघांमध्ये 50 लाख रुपयांबाबत बोलणं सुरू झालं. त्यावेळी त्यांच्यात वाद रंगला. दोन तास दोघांमध्ये हा वाद सुरू होता.
advertisement
यावर सनाने रागाच्या भरात अमितला अपशब्दांत सुनावले. यानंतर अमितने रागाने लोखंडी रॉड सनाच्या डोक्यात मारला. तिचा खून केल्यानंतर अमितने त्याच्या मित्राला फोन करून बोलावून घेतलं. दोघांनी सनाचा मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिला. खून झाल्यानंतर जेव्हा सनाच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार नागपूर पोलिसात केली तेव्हा याचा खुलासा झाला. नागपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत करत जबलपूरला पोहोचले. त्यानंतर तिचा खून झाल्याची माहिती समोर आली.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Aug 16, 2023 6:08 PM IST
मराठी बातम्या/नागपूर/
sana khan murder case : सना खान हत्या प्रकरणाची मोठी अपडेट,अखेरीस मृतदेहाचा लागला शोध







