आधारकार्डसाठी महिलांमध्ये तुफान राडा! तुम्ही अपडेट केलं की नाही? ही शेवटची तारीख
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नांदेडमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महिलांमध्ये वाद आणि हाणामारी झाली. 14 जूननंतर अपडेटसाठी पैसे लागणार असल्याने आधार केंद्रांवर मोठी गर्दी झाली आहे.
नांदेड, प्रतिनिधी मुजीब शेख: तुमचं नाव, पत्ता किंवा बर्थ डेट अथवा कोणताही बदल करायचा असो किंवा 10 वर्ष जुनं आधार कार्ड असेल तर तुमचं KYC अपडेट करायचं असूदे तुम्ही आधार कार्ड अपडेट करुन घेतलं का? नसेल तर तुमच्याकडे केवळ 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्याची ही शेवटची संधी आहे. त्यानंतर मात्र पैसे मोजावे लागणार आहेत.
जशी तारीख जवळ येत आहे तसं आधार केंद्राबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. यातूनच नांदेडमध्ये दोन महिलांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि दोन महिला आधार केंद्राबाहेर भिडला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलांनी जोरजोरात शिवीगाळ सुरू केली. आधार केंद्राबाहेर तुफान राडा पाहायला मिळाला.
advertisement
आधारकार्ड अपडेट करण्यासाठी नांदेडच्या पोस्ट ऑफिसमध्ये महिलांनी प्रचंड गर्दी केली. या गर्दीत नंबर लावण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला. वादातून हाणामारी झाली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला धक्काबुक्की करण्यात आली. शहरातील अनेक आधार केंद्र बंद असल्यामुळे नांदेड पोस्ट ऑफिसमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. दिवसभरात फक्त चाळीस आधार कार्ड अपडेट होत असल्याने सकाळपासूनच इथे रांगा लागत आहेत.
advertisement
सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर रेशन कार्डसाठी देखील तुमचं आधार कार्ड अपडेट आणि रेशन कार्डला सरकारी योजनांना लिंक करणं गरजेचं आहे. त्यामुळे गोंदियामध्ये ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केलं नाही त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तुमच्यावर ही वेळ येऊ नये यासाठी 14 तारखेची वाट पाहू नका. शक्य असेल तेवढं लवकर आधार कार्ड अपडेट करुन घ्या.
advertisement
14 जूननंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये प्रत्येकी द्यावे लागणार आहेत. नाव, वाढदिवस, पत्ता, लिंग, भाषा तुम्ही ऑनलाईन बदलू शकतात. बायोमॅट्रिक आणि फिंगरप्रिंट अपडेटसाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावं लागतं. यासाठी आताही पैसे द्यावे लागतात मात्र 14 जूननंतर सगळ्याच प्रक्रियेसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 29, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधारकार्डसाठी महिलांमध्ये तुफान राडा! तुम्ही अपडेट केलं की नाही? ही शेवटची तारीख