advertisement

50 हजारांची डिमांड,15 हजारांवर सेटलमेंट अन् एसीबीची झडप! सरपंच पती-पत्नीचा मुजोरपणा नडला

Last Updated:

तक्रारदार विशाल वारुळे यांनी ही मागणी धुडकावून लावत याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

News18
News18
नाशिक :  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी आणि धक्कादायक कारवाई करत रासेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून त्यातील 15 हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुक्यात तसेच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रासेगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच विशाल वारुळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. हा ठराव नामंजूर करून देण्यासाठी सरपंच मंदा बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी वारुळे यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार विशाल वारुळे यांनी ही मागणी धुडकावून लावत याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
advertisement

तक्रारदाराने काय म्हटलंय?

विशाल वारुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी जनतेतून निवडून आलेला उपसरपंच असून यापूर्वी एकही रुपया न देता पद मिळवले आहे. मात्र अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी माझ्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मी नकार दिल्यानंतर ते 15 हजार रुपयांवर तयार झाले. याबाबतचे सर्व पुरावे गोळा करून मी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
advertisement

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल 

तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला. ठरलेल्या योजनेनुसार, तक्रारदाराने सरपंच आणि त्यांच्या पतीला 15 हजार रुपये दिले असता एसीबीच्या पथकाने तात्काळ छापा टाकत दोघांनाही रंगेहात पकडले. अटकेनंतर दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

advertisement
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एसीबीच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
50 हजारांची डिमांड,15 हजारांवर सेटलमेंट अन् एसीबीची झडप! सरपंच पती-पत्नीचा मुजोरपणा नडला
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement