रात्र उलटली तरी पोरगं सापडेना...अंगणात खेळत होता अन् झाला बिबट्याचा शिकार, नाशिक हादरलं

Last Updated:

वडनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात श्रुतीक गंगाधर या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंब आणि गाव शोकाकुल, प्रशासनावर संताप, वन विभागाचा शोध सुरू.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं. घरात चिमुकल्या पावलांनी होणारा गोंधळ एका क्षणात थांबला आणि मनही सुन्न झालं. आई-बाबा त्या चिमुकल्याला वाचवूही शकले नाहीत, याची सल मानत राहिली आणि आता आई आई बाबा बाबा अशी हाकही ऐकू येणार नाही, कुटुंबियांनी मुलाचा मृतदेह पाहून टाहो फोडला आणि प्रशासनावर संतापही व्यक्त केला.
नाशिकच्या वडनेर परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने अवघा परिसर हादरुन गेला. एका निष्पाप दोन वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. आपल्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या श्रुतीक गंगाधर या 2 वर्षांच्या चिमुकल्याला बिबट्याने दबक्या पावलांनी येऊन उचलून नेलं.
या घटनेने केवळ कुटुंबच नाही, तर संपूर्ण गाव हादरले आहे. श्रुतीकचे वडील एक लष्करी जवान आहेत, जे देशाच्या सीमेचे रक्षण करतात. मात्र, आपल्या घराच्या अंगणात मुलाला सुरक्षित ठेवता आले नाही, या विचाराने ते मनातून पुरते कोलमडून गेले. श्रुतीकच्या आईने टाहो फोडला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. अद्याप श्रुतीकचा कोणताही पत्ता लागलेला नाही. बिबट्याने कोणत्या दिशेने श्रुतीकला उचलून नेले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि वन विभाग कसून प्रयत्न करत आहेत. पण रात्रीच्या अंधारात शोधमोहिमेला अनेक अडचणी येत आहेत.
परिसरात बिबट्याची दहशत
गेल्या काही काळापासून वडनेर आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये बिबट्याने माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य ती कारवाई झाली नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. आजच्या घटनेनंतर ही संतापाची लाट आणखी वाढली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रात्र उलटली तरी पोरगं सापडेना...अंगणात खेळत होता अन् झाला बिबट्याचा शिकार, नाशिक हादरलं
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement