नाशिककरांनो, लक्ष द्या! सिटीलिंक बससेवेत होणार मोठा बदल, आता 'या' बसफेऱ्या होणार बंद
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत दर किलोमीटर कमी उत्पन्न देणाऱ्या बस फेऱ्यांचा आता अभ्यास केला जाणार आहे. गरजेनुसार काही बससेवा...
नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत दर किलोमीटर कमी उत्पन्न देणाऱ्या बस फेऱ्यांचा आता अभ्यास केला जाणार आहे. गरजेनुसार काही बससेवा बंदही करण्यात येणार आहेत. इतकंच नाहीतर हाच निकष सकाळी 8 आणि रात्री 8 नंतर कमी उत्पन्न देणाऱ्या बससेवांनाही लागू करण्यात येणार आहे.
उत्पन्नवाढीचे नवे उपाय करावेत ः आयुक्त
महापालिकेत आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्या उपस्थित बैठक पार पडली, त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै 2021 पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच सिटीलिंक कंपनीतर्फे बसेसवा सुरू करण्यात आली होती. पण त्याच्या नुकसानाची मोठा भार महापालिकेवर पडतो आहे. त्यामुळे सिटीलिंकचे उत्पन्न वाढवण्यासाठी तिकिटांशिवाय इतर नव्या मार्गांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढीसाठी उपाय करावेत, अशा सूचना खत्री यांनी दिल्या.
advertisement
या बससेवांचाही केला जाणार अभ्यास
सध्या ज्या मार्गावर सिटीलिंक बससेवा दिली जात आहे, त्याचील सर्वात कमी प्रतिकिलोमीटर मार्गाचा अभ्यास केला जाणार आहे. आवश्यकता भासली तर बसफेऱ्या बंद करण्याचा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि रात्री 8 वाजल्यानंतर कमी उत्पन्न देणाऱ्या बससेवेचाही अभ्यास केला जाणार आहे. यावेळी ऑनलाईन पास, तिकिट खेरदी-विक्री करण्यावर अधिक भर देण्यासाठी प्रवाशांना युपीआयद्वारे पैसे देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही करण्यात आले. यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत नवी यंत्र उपलब्ध करून देण्याचीही सूचना करण्यात आली.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/नाशिक/
नाशिककरांनो, लक्ष द्या! सिटीलिंक बससेवेत होणार मोठा बदल, आता 'या' बसफेऱ्या होणार बंद