उच्चशिक्षित तरुणीचा दाबेलीचा व्यवसाय, नाशिकमधील mba dabeli food truck ला प्रचंड प्रतिसाद, महिन्याला 2 लाखांची कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
mba dabeli food truck nashik - नाशिक येथील उर्वशी पाटील हिने एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर नाशिकमधील एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीही केली. मात्र, तिला एक लहान मुलगी असल्याने तिला आपली नोकरी सोडावी लागली.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - शिक्षणानंतर काही जणांना नोकरी तर काही जणांना व्यवसाय करावीसा वाटतो. प्रत्येकाचे एक स्वप्न असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणीची कहाणी सांगणार आहोत. नाशिक येथील उर्वशी पाटील हिने एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर नाशिकमधील एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीही केली. मात्र, तिला एक लहान मुलगी असल्याने तिला आपली नोकरी सोडावी लागली. काही कालावधीनंतर तिच्या पतीचा व्यवसायही बंद पडण्याच्या परिस्थितीत आला आणि त्यांना कुटुंबापासून विभक्त राहण्याची वेळ आली.
advertisement
अशा परिस्थितीत आपल्या संसाराला हात भार लावण्यासाठी उर्वशी यांनी पुन्हा मनात काहीतरी नवीन करण्याचा विचार आला. मात्र, लहान मुलगी असताना 12 तास इतरांकडे नोकरी करणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी फूड स्टॉल लावण्याचा निर्णय घेत दाबेली विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आमच्या नातेवाईकांत दाबेली विक्री हा एकाच व्यवसाय असल्याने त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन आणि त्यात आपले काही तरी स्पेशल घटक मिळून 9 महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. आपला दाबेलीचा फूड ट्रक त्यांनी नाशिक येथील इंदिरानगरमध्ये चालू केला आहे.
advertisement
4 शेळ्यांपासून सुरू केलं बंदिस्त शेळीपालन, आज 30 शेळ्या अन् लाखो रुपयांचा नफा, सोलापुरातील शेतकऱ्याचा फॉर्म्युला काय?
सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी निर्माण होत गेल्या. परंतु त्यावर मात करत परिस्थितीला न घाबरता त्यांनी MBA दाबेली नावाने आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतल्याने आपल्या व्यवसायाचे नावही हेच ठेवावे, यामुळे आपल्या डिग्रीचाही देखील उल्लेख होईल, या संकल्पनेतून उर्वशी आपला व्यवसाय सुरू केला.
advertisement
उर्वशीचा एमबीए दाबेली हा फूड ट्रक आता नाशिकमध्ये प्रसिद्ध झाला आहे. याठिकाणी साधी दाबेली 30 रुपये आणि चीज दाबेली 40 रुपयांना मिळते. अशा 2 प्रकारच्या दाबेली याठिकाणी उपलब्ध आहेत. या व्यवसायातून महिन्याला त्या 2 लाख रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत. कमी पदार्थ जरी विकले तर त्याची क्वालिटी हवी, असे ती सांगते.
advertisement
तर तुम्हालाही याठिकाणी दाबेलीची चव चाखायची असेल तर तुम्हीही नाशिकमधील इंदिरानगर येथील गुरुगोविंद सिंग महाविद्यालयाचा हाकेच्या अंतरावर सम्राट स्वीटच्या समोर या एमबीए दाबेली फूड ट्रकला नक्की भेट देऊ शकता.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 07, 2024 4:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
उच्चशिक्षित तरुणीचा दाबेलीचा व्यवसाय, नाशिकमधील mba dabeli food truck ला प्रचंड प्रतिसाद, महिन्याला 2 लाखांची कमाई