Nashik News: नाशिककरांसाठी 'गुड न्यूज'! आता आणखी एक एक्स्प्रेस थांबणार स्टेशनला, मुंबईहून प्रवास झाला सोप्पा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नाशिकरांसाठी एक 'गुड न्यूज' आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आणखी एका हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसला थांबा मिळाला आहे.
नाशिक: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय रेल्वेकडून वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये एक्सप्रेस सोडत असतात. अशातच मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते झारखंड राज्यातील धनबादमध्ये एक्सप्रेस सोडली जात आहे. या एक्सप्रेसचा आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर सुद्धा थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही दर आठवड्याला धावणारी एक्सप्रेस 8 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या एक्सप्रेसचे रिझर्व्हेशन सुरू झाले अलून आयआरसीटीसीने जाहीर केले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस येत्या 8 एप्रिलपासून दर आठवड्याला धावणार आहे. 13380 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस दर बुधवारी पहाटे 04.55 मिनिटांनी सुटणार आहे. तर, धनबाद जंक्शनवर ही एक्सप्रेस तिसऱ्या दिवशी सकाळी 08.00 वाजता पोहोचेल. तर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस धनबाद वरून दर आठवड्याच्या सोमवारी सुटणार आहे.
advertisement
13379 अप धनबाद ते लोकमान्य टिळक टर्मिनस हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11.00 वाजता सुटेल. तर, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर ही ट्रेन तिसऱ्या दिवशी दुपारी 01.40 मिनिटांनी पोहोचेल. ही ट्रेन, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी साऊथ, खन्ना बनजारी, बेओहारी, बरगवां, सिंगरुळी, ओबरा डैम, रेनूकूट, गरवा रोड, डाल्टनगंज, लतेहार, टोरी, खलारी, पत्रातू, रांची रोड, बाकरा रोड, चंद्रपुरा, कत्रासगढ या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
advertisement
लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसची संरचना 2 द्वितीय श्रेणीचे वातानुकूलित डब्बे, 2 तृतीय श्रेणीचे वातानुकूलित डब्बे, 6 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी डब्बे, 6 स्लीपर डब्बे, 4 जनरल कोच आणि २ जनरेटर डबा अशी रेल्वेच्या डब्यांची रचना असणार आहे. ट्रेन क्रमांक 13380 साठी आरक्षण ०५ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. तिकिटांच्या आरक्षणासाठी प्रवाशांना 'RailOne' ॲपदेखील डाउनलोड करू शकतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 10:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिककरांसाठी 'गुड न्यूज'! आता आणखी एक एक्स्प्रेस थांबणार स्टेशनला, मुंबईहून प्रवास झाला सोप्पा










