नाशकात भरदिवसा खूनी थरार, नागरिकांनी हटकलं अन् तरुणाचा वाचला जीव, धडकी भरवणारा VIDEO

Last Updated:

Crime in Nashik: गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी पुन्हा एकदा शहरात थरकाप उडवणारी घटना घडली.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी पुन्हा एकदा शहरात थरकाप उडवणारी घटना घडली. सोमवारी दुपारी पंचवटी परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही जागरूक नागरिकांनी हल्लेखोरांना हटकल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि या हल्ल्यात युवक बचावला आहे. त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक युवक धावत पळत गजानन चौक परिसरातील कोमटी गल्लीत आला होता. दोन जण दुचाकीने पाठलाग करत होते. तो कोमटी गल्लीत आला असता दुचाकीवरील तरुणांनी त्याला अडवलं. त्याची कॉलर पकडून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. दुचाकीवरून उतरलेल्या एका संशयिताने तातडीने धारदार शस्त्राने युवकाच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मात्र, त्याचवेळी परिसरातील काही नागरिकांनी हा थरार पाहिला आणि त्यांनी त्वरित हस्तक्षेप करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसेच 'जाऊ दे रे, त्याला सोडून दे' असं म्हटलं. नागरिकांनी हटकल्यामुळे हल्लेखोरांना आपला इरादा पूर्ण करता आला नाही आणि ते तातडीने घटनास्थळावरून पसार झाले.
advertisement
हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे, तर काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्येही या घटनेचे चित्रण केले आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित फरार झाल्याने पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमध्ये चित्रित झालेल्या व्हिडीओच्या आधारे दोघा हल्लेखोरांचा कसून शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशकात भरदिवसा खूनी थरार, नागरिकांनी हटकलं अन् तरुणाचा वाचला जीव, धडकी भरवणारा VIDEO
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement