'दारु पाजतो घरी ये', तरुणाला पार्टीला बोलवून चॉपरने वार, जळगावात रक्तरंजित कांड, कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन नाना काळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्याम तुकाराम सूर्यवंशी याला ताब्यात घेतलं आहे. संशयित आरोपी श्याम सूर्यवंशी याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्याम सूर्यवंशी आणि मयत नितीन काळे दोघंही चांगले मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी आरोपीनं नितीनला दारु पार्टी करण्यासाठी बोलावून घेतलं होतं. प्यायला बसल्यानंतर आरोपीनं जुन्या वादातून नितीनवर चाकुने वार करून त्याचा जीव घेतला.
दोघांमध्ये नेमका वाद काय होता?
श्याम आणि नितीन यांच्यात जुना वाद होता. श्यामने काचेची बाटली फोडून नितीनवर हल्ला केला होता. या प्रकरणाची केस न्यायालयात सुरू होती आणि त्यासाठीच नितीन गोव्याहून जळगावात आला होता. दरम्यान, केस मागे घेण्यासाठी श्यामकडून दबाव टाकला जात होता. मात्र केस मिटवत नाही. म्हणूनच श्यामने चॉपरने नितीनचा खून केल्याचा आरोप मयताचे वडील नाना काळे आणि भाऊ राजू काळे यांनी केला आहे.
advertisement
तर श्यामने नितीनला दारू पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि जुन्या वादातून त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रांची मोठी गर्दी झाली होती. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 11:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'दारु पाजतो घरी ये', तरुणाला पार्टीला बोलवून चॉपरने वार, जळगावात रक्तरंजित कांड, कारण समोर








